पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/500

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७५ [२७१] ॥श्री॥ २० डिसेंबर १७६०. पु॥ राजश्री कारकून दिमत गोविंद बल्लाळ गोसावी यांसिः सु॥ इहिंदे सितैन मया अलफ. तुह्मीं दिल्लीस ऐवज आणिला आहे, त्यापैकी बदल देणे पागा दिमत रंभाजी कदम यास मुबाखाचे बेगमीबदल रुपये १५० रुपये तुझाकडून देविले असेत. तरी पावते करून पावलियाचे कबज घेणे. जाणिजे. छ ११ जलावल. आज्ञा प्रमाण ( लेखन सीमा). [२७२] ॥श्री॥ २३ डिसेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गंगाधर गोविंद स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी-विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. गोविंद बल्लाळ दिल्लीकडे फौजसुद्धा आले. गाजद्दी नगरानजीक त्यांचा व गिलज्याचे फौजेचा मोकाबला होऊन गोविंद ३२३ बळवंतराव मेहेंदळे ७ डिसेंबर १७६० रोजी वारला. त्यानंतर काही दिवसांनी ह्मणजे २२ डिसेंबर १७६० रोजी गोविंदपंत मारला गेला. व दुसरे दिवशी किंवा त्याच दिवशी त्याचे शिर अबदालीने भाऊंकडे पाठवून दिले. ह्या संबंधाने नानाच्या बखरीत छापलेले खालील पत्र वाचावें. हे पत्र विविधज्ञानविस्ताराच्या ५ व्या पुस्तकाच्या ७ व्या अंकात पुनः छापिलें आहे. श्री नक्कल. चिरंजीव राजमान्य राजेश्री मोरोबादादा यांप्रति बाळाजी जनार्दन आशीर्वाद उपरी येथील कुशळ तागाईत चं. १९ जमादिलोवल पावेतों मुकाम पाणिपत एथें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाहले, आपणाकडून पत्र येऊन, कांहींच वर्तमान कळत नाही. तरी निरंतर पनी संतोषवीत जावें. इकडील मजकर पूर्वी कुंजपुन्यास लढाई जहाली. अबदुलसमदखान वगैरे मारले. त्याजवर, आबदालीची गांठ पडली. कृष्ण जोशी संगमेश्वरकर यांस गोळा लागून देवआज्ञा झाली. इतकें वर्तमान तपशीलवार लेहून पाठविले होते, त्यावरून