पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/499

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७४ सत्वर पावेसा करणे. दारू फारच लौकर आली पाहिजे. बहुत काय लिहिणे, हे विनति. [२६९] ॥ श्रीशिव ॥ १४ डिसेंबर १७६०. राजमान्ययाविराजितराजश्री बाळाजी गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः पोण्य नारो गंगाधर नि॥ राजश्री गणेश गंगाधर महाल तोफखाना दि॥ निहाय. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि. तुह्मांवर वरात श्रीमंत " भाऊसाहेबीं रु॥ २००० दोन हजार देविले होते ते रुपये वरातेचे दोन हजार भरून पावलों. ॥ ॥ धोंडाजी हरबाजी नवाळे याचे विद्यमानें भरून पावलो. हे लिहिले. मार्गशीर्ष सुध ७ सप्तमी शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे छ ५ जमादिलावल. --- - [ २७० ] ॥श्री॥ १८ डिसेंबर १७६०. राजश्री पांडुरंगपंत दि॥ ॥ गोविंद बल्लाळ स्वामी सेवेसिः सेवक नारो शंकर नमस्कार विनंति उपरि. राजश्री गोविंदपंत यांहीं श्रीमंताचा खजाना रुपये ४२०००० चार लक्ष वीस हजार तुह्मांकडून आमचे स्वाधीन करविला आहे. त्याजपे॥ राजश्री धोंडाजी नाईक नवाळे यास रुपये ५०००० पन्नास हजार देणे. कबज घेणे. छ ९ जमादिलावल. सु॥ इहिदे सितैन. बहुत काय लिहिणे. हे विनंति.