पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साजनीतीच्या धोरणाने वाळाजीच्या प्रयत्नांचा विचार केल्यास झालें तें योग्यच झाले असें ह्मणणें प्राप्त होते. इतकेच की, जें झालें तें पानिपत येथील घोरसंकटामुळे पूर्णपणे झाले नाही. एवढेच नव्हे; तर जे झालें तें अंशतः न झाल्यासारिखेंच झाले. हे पाहून मन किंचित् उद्विग्न हाते. उद्विग्न होण्याचे कारण असे आहे की, ही पानिपत येथील विपत्ति पर्यायाने व परंपरेने मराठ्यांच्या राष्ट्राच्या नाशास कारण झाली. तो कशी झाली व तिची कारणे प्रस्तुत ग्रंथांत छापिलेल्या पत्रांच्या आधाराने काय होती त्याचा पुढील विवेचनांत सविस्तर प्रपंच केला आहे. विवेचन पांचवें. दुसऱ्या, तिसऱ्या व चवथ्या विवेचनांवरून दिसून येईल की मराठ्यांनी १७६१ पर्यंत जी जी कृत्ये केली त्या सर्वांत एकच धोरण होते. महाराष्ट्रधर्म वाढविणे हा मुख्य मुद्दा होता. हा मुद्दा अस्पष्ट रीतीने त्यावेळच्या मुत्सद्यांच्या मनांत होता असा बिलकुल प्रकार नाही. महाराष्ट्रधर्माची कल्पना व तत्साधनार्थ योजिलेल्या उपायांचे व्यवस्थित स्वरूप तत्कालीन मुत्सद्यांच्या, विचारी पुरुषांच्या व सेनापतींच्या मनांत स्पष्टपणे आविर्भूत झालेंले दिसते. हिंदुधर्माची प्रस्थापना, गोब्राह्मणांचा प्रतिपाल, स्वराज्याची स्थापना, मराठ्यांचे एकीकरण व त्यांचे पुढारपण, ही जी महराष्ट्रधर्माची मुख्य अंगें त्यांचा उच्चार शिवाजी राजाच्या तरुणपणी जसा स्पष्टपणे झालेला दिसतो तसाच खर्ध्याच्या लढाईनंतर नाना फडणिसाने निजामाशी केलेल्या तहांतहि दिसून येतो. ह्या तहांत धर्म, गोब्राह्मण व स्वराज्यह्यांच्या संरक्षणार्थ कलमें आहेत. तेव्हां १६४६ पासून १७९६ पर्यंत महाराष्ट्रधर्माची प्रसूति होत असतां मराठ्यांचे पुढारपण वेळोवेळी निरनिराळ्या जातींनी घेतले. प्रथम स्वराज्याची शुद्ध कल्पना उत्पन्न झाली. तत्साधनार्थ मराठ्यांचे पुढारपण शिवाजी, राजाराम, शाहू व अनुषंगाने बाळाजी विश्वनाथ ह्यांनी घेतले. ह्या चार पुरुषांच्या प्रयत्नानें ज्याला स्वराज्य ह्मणून प्रथम संज्ञा दिली गेली तो सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. स्वराज्याचे साधन केल्यावर मराठ्यांच्या वाढत्या पराक्रमाला स्वराज्यांतर्गत प्रदेश संकुचित भासू लागला व तो उफाड्याने स्वराज्याच्या मर्यादेच्या बाहेर पसरूं लागला. ह्मणजे सार्वभौमत्वाची कल्पना त्यावेळी अवश्य होऊन तिचा स्पष्ट उच्चार बाजीरावाने शाहूपुढे करून दाखविला. ह्या कालापासून हिंदुपदवादशाहीची प्रस्तावना झाली. हिंदुपदबातशाहाची प्रस्तावना बाजीरावाच्या पुढारपणाखाली झाली हे जरी खरे आहे, तरी ती शाहूराजाच्या सल्ल्याने झाली ह्मणून तिला मी हिंदपदबातशाही हे नांव दिले आहे. शाहूराजा वारल्यानंतर किंवा वारण्याच्यापूर्वी देखील सातारच्या छत्रपतींचें तेज मावळत जाऊन महाराष्ट्राचे पुढारपण पेशव्यांच्या हातांत आले. ह्मणून चाळाजी बाजीरावाच्या उत्तरार्धापासून ब्राह्मणपदवादशाहीचा प्रारंभ झाला ह्मणून मी झटले आहे. ब्राह्मणपदबातशाही ह्मणजे हिंदुपदबादशाहीच होय. १७५० पर्यंत ह्या बादशाहीची प्रस्तावना भोसल्यांच्या कुळाच्या नांवाने होत असे. आतां ती पेशव्यांच्या कुळाच्या नांवाने होऊ लागली. पहिलीस भोसले