पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/498

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात, त्यांस पत्र लश्करीहून त्यांचे बंधू आले. तें पत्र वाचून त्याची नकल करून बजिन्नस अक्षरशा पाठविली. त्या पत्रावरून सविस्तर कळेल. लश्करचे सविस्तर वर्तमान लिहिले आहे. कळावें. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे. हे विनंति. सेवेसि आपत्ये समान दामोदर मधसूदन सा॥ नमस्कार विनंति लिहिली. परिसो. लोभाची वृद्धि कीजे. हे विनंति. सेवेसि विनंति सेवक माणको महादेव व हरी कृष्ण करद्वय जोडून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना लिहिली. परिसोन कृपा कीजे. हे विनंति. [२६८] ॥ श्री ॥ १५ नोव्हेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥ यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. सरकारांत दारूचे प्रयोजन आहे, तरी तुह्मांकडून दारू चार खंडी पांच खंडी असेल ते ताबडतोब रवाना करून दिल्लीस येऊन पोहोंचे ते गोष्ट करणे. या कामास दिरंग एकंदर न लावणे. जलदीने रवाना करणे. + जाणिजे. छ ६ रबिलाखर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. येथे काम मोठे आहे. वीस खंडी दारू, पांच खंडी शिसें तयार करणे. त्यांत तयार जे असेल तें पत्रदर्शनी रवाना करणे की दिल्लीस लौकर येऊन पोहोंचेशी करणे. फौज सुद्धां लौकर येणे. ऐवज रवाना करणे. हे लिहिलेप्रमाणे एकहि काम होऊन न आलें. फार दिवस खावंदाने लहानाचे थोर केलें, वाढविले, त्याचे सार्थक केलें ! अजून तरी सावध होऊन लिहिलेप्रमाणे येऊन पोहोंचणे. दारू, शिसे व ऐवज दिल्लीस ३२२ ही गोविंदपंताची शिफारस ध्यानात ठेवण्यासारखी आहे !