पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/497

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७२ मक्षावयास नाही. याप्रमाणे विचारांत पडला आहे. मागाहून युद्ध जाहल्यावरी सविस्तर होईल ते लिहूं. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. [ २६६] ॥श्री॥ ७ नोव्हेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. बद्दल देणे अजुरा खर्च प्रयागाहून गंगाजलाच्या कावडी दीनानाथ प्रयागवळ याणी मोहन कहार वगैरे ॥ २५ याजबरोबर पाठविल्या त्याचा अजुरा दर कावडीस रुपये ६ प्रमाणे रुपये १५० दीडशें रुपये तुह्माकडून देविले असेत. प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजी पावते करून कबज घेणे. वरात हरदु मुसंन्ना मजुरा एक असे. जाणिजे. छ २८ ॥वल, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२६७] ॥ श्री ॥ १५ नोव्हेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री आपा स्वामीचे सेवेसिः पोष्य लक्ष्मण बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुरल ता॥ कार्तिक सुध ७ भृगुवासर संध्याकाळ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांची कासद जोडी आजुरदार पत्रे श्रीस, बलवडसिंग राजास व राजश्री मोरो बल्लाळ जोशी यांस पत्रे होती. ते जोडी येथे पोटास मागावयास आले. त्यानी पर्ने सरकारी दाखविली. त्या पत्रांसमागमें दिवाकर जोशी ब्रह्म घाटी राह