पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/496

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७१ खणून जमीनीबरोबर केली. लोक आभर जाहले. श्रीमंतास भूमिगत सात लक्ष रुपये सांपडले. तेथून कूच करून कुरुक्षेत्रास चालिले होते इतकियांत अबदाली बागपतापाशी यमुना पायाब उतरून सोनपथास आला. हे वर्तमान श्रीमंती ऐकतांच माघारे फिरोन यवनाचे सन्मुख दरमजल फणिपथास आले. यवन येथून दोन कोसावरी राहिला आहे. नित्य थोडे थोडें युद्ध होत आहे. श्रीमंतांहीं चोहोंकडे तोफखाना पसरला आहे. यवनास थोर भय जाहलें आह. पुढे येववत नाही. आमचे सैनिक यवनाचे समक्ष उभे राहून, नित्य शेपन्नास यवन मारून उंट, घोडी आणितात. दोन हत्ती पेंढारी यांनी काल आणिले. यवनाच्या सैन्यांत रसदै बंद जाहली. यामुळे पीठ ४४३ व चणे ४४४ तूप ४॥याप्रमाणे महर्ग जाहलें आहे. आमचे सैन्यांत गहूं १६ व चणे १२ व तूप ४४२॥ याप्रमाणे सवंगाई आहे. आणखी दोन चार दिवसांत यवन चालोन तोफावरी येईल तरी क्षणमात्र बडेल. न ये तर आमचे लोक जाऊन युद्ध करणार. वरकड सर्व प्रकारे करून शुभ चिन्हें होतात व स्वप्ने उत्तम श्रीमंतांस होतात. याजवरून सर्व सैन्यास उत्साह आहे, की अबदाली व नजीबखान व सुज्यातदौला आठा चौ दिवसांत क्षयास जातील ऐसें दिसतें. अबदाली शाहानशाहा ह्मणवीत होता. त्याने युद्धं बहुत केली आहेत, परंतु तो दो कोसांवरी येऊन आठ दिवस बसोन कांहीं पराक्रम होत नाही. याजमुळे आमची फौज बहुत शेर आहे. अबदालीने स्वदेशास जावें तरी मार्ग नाहीं; युद्ध करावें तरी परिणाम नाहीं; उगेंच बसावें तरी ३२१ यमुनेस पाणी फार असल्यामुळे यमुना उतरल्यावर काही दिवस अबदालीच्या सैन्यांत फार महर्गता झाली. दिल्लीस मराठे असल्यामुळे यमुनेच्या दक्षिणतीरानें अबदालीला कही मिळणे अशक्य होते. त्याला कही अंतर्वेदीतून यावयाची. परंतु अंतर्वेद सोडून तो यमुनेच्या दक्षिणतीरी आल्यामुळे त्याला अंतर्वेदीतून रसद मिळणे प्रथम प्रथम कठीण पडले. परंतु पुढे लवकरच पाणी जसजसें उतरत गेले तसतशी अबदालीच्या सैन्यांत चंगक झाली. ह्या पत्रांत अबदालीच्या सैन्यांत महागाई झाली ह्मणून ह्मटले आहे. ती महागई गोविंदपंताच्या पराक्रमामुळे झाली असा मुळीच अर्थ नाही. ती महागाई यमनेच्या पाण्याने व अबदालीने केलेल्या स्थलांतरामुळे झालेली होती. गोविंदपंत अंतर्वेदीत असन त्याने हे पायबंद देण्याचे व कही अडविण्याचें सहज होण्यासारखे काम केले नाही."