पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/495

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठ्या कामाच्या उपयोगांतून जाल असें करून न घेणे. + तुह्मी दरमजल बागपतचे सुमारे अंतरवेदीतून येऊन रसद मारणे. नजीबखानाचा मुलक जाऊन लुटून फस्त करणे. ऐवज रसदेचा पांच सातशें राऊत देऊन आगरियावरून जलदीने दिल्लीस येऊन पोहोंचेसा करणे. जाटाच्याने अटकाव होत नाही. वेडेवाकडे तो करणार नाही. मातबर एकदाच यावा. त्यांत दोन तीन लाख एकेकदां उटे चांगले राऊत देऊन रवाना करावे. दिल्लीस पावलियावर जसं दिसेल तसे पुढे आणून घेऊ. दोन चार हजार चांगली निवडक फौज लांब लांब मजली करून लिहिलप्रमाणे रोहिलियांच्या मुलुकांत दंगा व रसद बंद करणे. कांहींच न झाले तरी परिछिन्न तुह्मांवर शब्द येईल. वारंवार लिहिलियाची, आपले अबरूची इरे धरून काम बजावून आणणे. या दिवसांत तुह्मी येऊन लिहिलेप्रमाणे पावला असता तर किती काम होतें ! अजून तरी करून दाखवणे. गंगापार जमीदारांकड़न दंगा करवणे. गोपाळराव गणेश फौजसुद्धां गंगापार उतरून जमीदार सामील करून सुजादौला रोहिले यांचा अंमल उठवावा. याप्रमाणे करणे. मसलत मोठी. या दिवसांत ज्यास जे लिहावे त्याप्रमाणे होऊन न येई मग तुह्मी आमचे कामाचे काय ? याउपरि आज्ञेची व चाकरी करून दाखवावयाची सीमा झाली ! लिहिलेप्रमाणे सत्वर करणे. रवाना छ २५ ॥विल वल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २६५ ] ॥ श्री ॥ ५ नोव्हेंबर १७६०. चिरंजीव राजश्री दिवाकर जोशी यासि प्रती कृष्ण जोशी आशीर्वाद उपरि येथील कुशल तागाईत आश्विन वद्य १३ बुधवारपर्यंत मु॥ फणीपत येथे सुखरूप असो. विशेष. वर्तमान तरी श्रीमंतांहीं महाष्टमीस समयखान व कुतुबशहा मारून, दहा हजार सेना लुटून, कुंजपुरा घेऊन लुटिला. गढी