पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किमपि न येतां चालढकलीवरी हा कालपर्यंत नेले. धातुपोषणार्थ मात्र .. लिहितां की मजला ऐवजाचे तर्तुदीशिवाय दुसरा अर्थ नाही, तर्पद केली, करतो, एका दो दिवशी रवानगीहि करितों, येतो, कार्यावरी आज्ञेप्रमाणे जातो. ऐशा गोष्टी रिकाम्या लिहितां. मात्र निदर्शनास यांतील एकहि येत नाही. यामुळे तुमच्या कर्तृत्वाची तारीफ वाटते ! ते कोठपर्यंत लिहावी ? लिहितां लिहितां भागलों ! हे तुमच्या कर्तुत्वास उत्तम नाहीं. याउपरि पत्र पावतांच रसदेचा व बाकीचा ऐवज मातबर भरणा करून अविलंबे रवाना करणे. दिरंग एकंदर न लावणे. कदाचित् अबदाली यमुनेच्या दक्षिणतीरी आल्यामुळे मार्ग सुद्धा नाहीं, ऐवज कसा रवाना करावा, हे निमित्य ठेवाल. आणि हा तपशील लिहावा तरी असें न करणे. अबदालीची आमची गांठ पाणीपताजवळ पडली आहे. तोफखान्याचा आराबा रचून लढाई करावयास तयारी केली आहे. त्याच्याने इकडे तिकडे जावत नाही व कांहीं करवत नाही. पावणेदोन कोस दीड कोसाची तफावत आहे. पेंढारी व लुगारे राऊत वगैरे नित्य उंटें, घोडी, तट्टे, बैल अघाडी पिछाडीवरी जाऊन गोटापासून घेऊन येतात. त्याचे कोणी पाठीवरहि निघत नाही. याप्रमाणे आहे. तुझीं या गोष्टी भयाच्या कोण्हेविशीं चित्तांत न आणितां सत्वर ऐवज दिल्लीस रवाना करणे. तेथें आलियावरी आह्मी हरतर्तुदेने घेऊन येऊ. विलंब न लावणे. जलद जलद ऐवज दिल्लीस येऊन पोहोंचे तें करणें. तुझींहि पत्र पावतांच अंतरवेदींतून पटपटगंजावरी यांच्या पछाडीस येऊन पोहोंचणे. सावकास याल तरी ठीक नाही. लांब लांब मजलीने येणे. रसद त्याजकडे जावयाची आढळेल ते लुटणे, दबाव पाडणे, ह्मणजे चहूंकडून घाबरा होईल. हेहि युक्त तुझांस बहुत वेळ लिहिली. परंतु तुह्मी येत नाही. सारीच डोळेझांक करितां. परंतु असा समय चाकरी करून दाखवावयाचा पुढे कदापि येणें नाही. या हंगामी जो आपले शक्तीपेक्षां चाकरी आधीक करून दाखवील त्याचे रूप आहे. हे दूरदेशी ध्यानात आणून सर्व गोष्टी लिहिल्याप्रमाणे करणे. ऐवज पाठवणे. तुह्मीं येणें. लहान सहान गढ्यामुळे गंतोन