पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाला. अद्याप ऐवज आला नाही. त्यास येथे युद्धप्रसंगाचा समय असतां आपण ऐवजास विलंब करावा हे गोष्ट इष्टत्वाहून दूर असे. आह्मांस येथे खर्चाची निकड विशेष आहे, ह्मणून बंधुत्व जाणून आह्मीं वरात घेतली असतां विलंब ऐवजाम व्हावा हे अपूर्व आहे. आतां कृपा करून वायद्यावर दृष्ट न देऊन पंत मशारनिलेबरोबर ऐवज येथे पोहचे तो अर्थ आपण करतील. कदाचित् सावकारी नुकसान वाइद्याबद्दल बसेल ते देऊ. परंतु समयावर दृष्ट देऊन ऐवज आह्मांस अगत्य पोहचावले पाहिजे. + श्रीमंत स्वामीचें पत्र तुमचे नांवें आलें तें पाठविलें असे. अंतरवेदीत मोगलांचे मुलकांत तुमची फौज येऊन मोगलास पायबंद द्यावा ह्मणोन श्रीमंतांची मर्जी. वरचेवर तुझांकडे ताकीदपत्रे येत असतां अद्याप आपली फौज प्रांतास येत नाहीं. ऐसे नसावें. लौकर या समयीं येऊन पोहचावें. उचित असे. वरातेचा ऐवज लाख रुपये स्वारीस मोगलाच्या प्रांतास येतां समागमें आणावा. अथवा झांसीकडे ऐवज पावे ते करावें. साडेसवीस हजार रुपये घाटमपूर वगैरे वरातांचे बलगोविंद याचे येथें पेशजी वरातांपैकी पावले न पावले. आझांस सावकार मजकुराची रसीद न आली. त्यास हें कैसें वर्तमान तं लिहावें व ऐवज पावला नसेल तर ताकीद करून सत्वर पावे तो अर्थ करावा. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ कार्तिक शुद्ध ७ शनवार, म॥ इटावें. २६४ ॥श्री ॥ ४ नोव्हेंबर १७६० राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. येथील खर्चाचे ओढीकरितां ऐवजाविशी तुह्मांस वारंवार फारच लिहीत गेलो. परंतु ह्या गोष्टी तुमच्या चित्तांत