पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वामीची आज्ञा घेऊन जसवंतनगरापाशी आलों तो राजश्री लक्ष्मणपंत यांजकडून लश्करचें वर्तमानाचे पत्र आले तेच बजिन्नस सेवेसी पाठविलें आहे. त्याजवरून विदित होईल. महाटी फौज शेरै' झाली. याउपरि अबदालीचें पारपत्य सत्वरच होईलसें दिसतें. मी आज रातोरात सकुराबादेस आज्ञेप्रमाणे जातो. तेथून सविस्तर वर्तमान सेवेसी लिहीन. कृपा करावी. हे विज्ञापना. पे॥ मित्ती कार्तीक सुध ७० शनवार मु॥ इटावं. [२६३] श्रीगजानन ३ नोव्हेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंदपंत दाजी स्वामीचे सेवेसिः पोप्य नारो शंकर कृतानेक सा॥ नमस्कार विनति उपरि येथील कुशल ता॥ छ २४ माहे रबिलावल मु॥ दिल्ली जाणून स्वकीय कुशल वर्तमान लिहून संतोषवीत गेले पाहिजे. विशेष. आपले आमचे बंधुत्व जाणून श्रीमंत स्वामीपासून वरात आपणावर घेतली. ते वरात घेऊन राजश्री कृष्णाजीपंत आपल्याकडे पाठविले आहेत. पंतमजकुरास जाऊन दीड महिना - सवाल ३१९ अबदालीचे सैन्य यमुनेच्या दक्षिणतरी आल्यावर व येतांना मराठ्यांच्या व मिळज्यांच्या झटापटी दररोज चालल्याच होत्या. पैकी नदी उतरतांना जी चकामक झाली ती होत असतांना मराठे आपण होऊन मागे सरकले असे दिसते. नाहीतर नदीच्या उतारांतून अबदालीचे सैन्य सुरक्षित आले असते असे वाटत नाही. या गोष्टीचा प्रपंच प्रस्तावनेंत यथास्थित केला आहे. नंतर अबदाली बागपतेच्या पुढे संभाळक्यावर आल्यावर मराठ्यांच्या पिछाडीचं व अबदालीच्या आघाडीचे युद्ध झाले. त्यांत मराठे शेर झाले. गोविंदपंताने जर प्रामाणिकपणाने काम केले असते तर अबदालीची ह्यावेळी धडगत नव्हती ह्या गोष्टीचा विशेष प्रपंच प्रस्तावनेत केला आहे. ३२० ह्या पैवस्तीवरून गोविंदपंत कार्तिक शुद्ध सप्तमीस ह्मणजे १५ नोव्हेंबर १७६० रोजी इटाव्यास होता हे उघड आहे. ग्रांटडफ् ह्या सुमारास गोविंदपंताला अताईखानाने ठार मारले ह्मणून ह्मणतो तें चूक आहे, हे पुढे स्पष्ट दाखवून दिले आहे. वळवंतराव मे दळ्याच्या पाठीमागून गोविंदपंत मारला गेला. .