पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आला. खासा स्वारी कुंजपुरियाहून पाणिपतास आली. त्याजवर तीन दिवस गणोरास होते. तेथून भालकियास आले. तेथून दोन अडीच कोस आजी आले. फार आवळून चालतात. कही लांबवू देत नाही. चाळीस कोस, पन्नास कोस धावतात ते नाहीं ! अंतर थोडके आहे. त्याचे आमचे बातमीची गोळागोळी होती. याप्रमाणे तीन दिवस होते. दाणा दोन अडीच शेर गिलज्याचे लष्करांत आहे. हिंमत फार आहे. तरी यास गिळणार. त्यास, लढाई लौकरीच होऊन येईल. परंतु तुह्मीं जलदीने यमुनेपलीकडून येऊन बागपतेपर्यंत धुमामा चालवून यास रसद न पोहचे, फौजेस शह पडे, ऐसे करावें. आतां गिलज्याचा पेंच तिकडे नाही. तुमच्यापाशी सिही या पेंचामुळे लागणार नाही. यास्तव लांब लांब मजलीने येणे. सुज्याअतदौलाचे मुलकांतहि जमीदारांजवळून धुंद करवणे. या कामास दिरंग न लावणे. हे काम मागेच करावें ऐसें होतें. याउपरि तपशील न लावणे. जाणिजे. छ २२ रबिलोवल. बुंधेले वगैरे त्यास पत्र पाठवणे. त्या हि खबर लिहिणे. जाणिजे. छ मजकूर. दोनचार हजार फौज सडी निवडून बागपतेजवळ यमुना पारून यावें. रसद मारावी. गडमुक्तेश्वर, शामळी, वगैरे नजीबखानाचे प्रांत जाळावे. अबदालीस मागें रसद बंद होऊन मुलुकाचा बोभाट होय असें जरूर करणे, वारंवार लिहिले जाऊन अजून तुह्मी उमरगडींच आहां हें अपूर्व आहे ! आतांहि लिहिलेप्रमाणे न जालें तरी मर्दुमीचे काम होत नाहींसेच जालें ! ईरे धरून तडकून येऊन काम करणे. ॥ छ २२ ॥लावल. हे विनंति. [२६२ ] ॥श्री॥ ३ नोव्हेंबर १७६०. श्रीमंत राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः विनंति सेवक करद्वय जोडून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना.