पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/490

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पांचसा हजार प्यादा लुटला. यामुळे अबदालीचे लश्करांत दहशत पडली. कितेक लोक उठून जातात. अबदाली कुच करून बागपतेवर चार कोस कांहीं फौजहि उतरूं लागली. लौकरच त्याचे पारपत्य होईल. तुहीं तिकडून गॅनीमी त-हेनें उगळा लावावा. अबदाली अलीकडे आला. तुझी पुढे येऊन वाटा त्याच्या माराव्या. कांहींच होऊन येत नाही. उत्तम नाही. सत्वर लिहिलेप्रमाणे करणे. हे विनंति. 24 [२६१] ॥ श्री॥ १ नोव्हेंबर १७६०. राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥ विनंति उपरि. अबदाली यमुना बागपताजवळ उतरला आणि गणोरास ( पृष्ठं १०।११) ह्मटले आहे. परंतु लेखांक २६५त कुंजपुरा महाष्टमीस ह्मणजे १७ अक्टोबर १७६० रोजी घेतला ह्मणून स्पष्ट लिहिले आहे. ह्या वर्षी दसरा १९ अक्टोबर १७६० रोजी होता. कुंजपुरा घेऊन भाऊ कुरुक्षेत्रास जावयास निघाले ह्मणून लेखांक २६५त लिहिले आहे. काशीराजाच्या मते कुंजपुयाहून भाऊ दिल्लीस परत आले व तेथें त्यांनी दसन्यास फौजेची गणती केली. परंतु भाऊ कुंजपुयास जे गेले ते दिल्लीस पुन्हा परत आलेच नाहीत. तेव्हां दिल्लीस जाऊन फौजेचा गणती भाऊंनी केली नाही हे उघड आहे. भाऊंचा दसरा कुंजपुऱ्यास झाला त्याअर्थी गणती कुंजपुऱ्यासच झाली ह्यांत संशय नाही. 3१७ भाऊ गनीमी त-हेनें लढाई खेळले नाहीत असा त्यांच्यावर एक आगेप आहे परंत मोगली व गनीमी अशा दोन्ही तन्हांनी युद्ध करण्याचा भाऊंचा विचार होता. जबर तोफखाना जवळ असल्यामुळे ठाणबंद होऊन मोगली त-हेनें लढाई चालविण्याचा भाऊंनी बेत केला. व गनीमी त-हेनें शत्रूस भांबावून सोडण्यास गोविंदपंत, गणेश संभाजी व गोपाळराव गणेश यांस हुकूम केला. हा हुकूम ह्या तिघांनी कितपत पाळला हे ह्या पत्रांतन सविस्तर वर्णिलंच आहे. ३१८ अबदाली २५ अक्टोबर १७६०ला यमुना उतरून बागपतेवर आला. त्याचें सैन्य तीन चार दिवस नदी उतरत होतें तें २८ अक्टोबराला सबंध यमुनेच्या दक्षिणतीराला आले.