पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/489

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अलीगाहरचा केला. आपले तालुकियांतहि शाहाआलमाचा गजशिक्का चालवणे. महिनाभर फौजा उतरायाजोगें पाणी होत नाही. कुंजपुरियास समदखान आहे. आमी कुच करून त्याचे पारपत्य करितों. अनदाली तिकडे आला तर उत्तम. न आलिया फिरोन येऊ. तुझी लिहिलेप्रमाणे शह देणे. जाट आपलाच आहे. वसवास नाहीं. ऐवज सत्वर खबरदारीनें दिल्लीस सत्वर पोहोंचेसा करणे. पुढे सोईने घेऊन जाऊं. ऐवजाविशी आह्मी लिहा [ २६०] ॥श्री ॥ २५ अक्टोबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांस दोन चार पत्रे पाठविली की तुह्मीं व गोपाळराव गणेश एकत्र होऊन जलदीने सुजातदौलाचे मुलकांत हंगामा करणे व रसद न चाले तें करणे. शेंपन्नास राऊत प्यादे येतील जातील, त्यांस लुटून मारून टाकीत जाणे. असे लिहीतच गेलों परंतु तुह्मी गढ घेत बसला हे काय ? तरी याउपरि पत्रदर्शनी सुजातदौलाचे मलकांत हंगामा करणे. व अलीकडील रसद वगैरे मारीत जाणे. नेहमी मुलकांत फिरावें. कोठे रसद मारावी. कोठे गांव लुटावा. वाट मारावी. माणसें मारून टाकावी. दहशत बसवावी. हेच नित्य करावं. मुलूक अंतरवेदीतील व गंगापारचा लटीत जावा, वाटेचे गांव व रस्ते असतील त्यांस दहशत पडोन बेचिराख होय तें करावें. + वारंवार लिहिणे ते लिहिले; परंतु तुमचेकडन त्यास उपसर्ग करावा हे होत नाही. पायबंद बसत नाही. तरी याउपरि या गोष्टीस उशीर न लावणे. वरचेवरी वर्तमान लिहित जाणे. जाणिजे. छ १५ रबिलावल सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. हे विनंति. कुंजपुरा व पांच सात हजार फौज, ३१६ कुंजपुरा २० अक्टोबर १७६० रोजी घेतला ह्मणून भाऊसाहेबांच्या कैफियतीत