पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होईल असा बाळाजीचा बेत होता. परंतु, ज्या हट्टानें व अज्ञानाने १७४९ त शाहला पछाडिलें त्याच हट्टानें व अज्ञानाने १७६० त संभाजीला गांठिले व त्याने मरणापूर्वी खानवटकर भोसल्यांच्या कुळांतील एक मुलगा दत्तक घ्यावा असें ठरविले. पुढे १७६२ त जिजाबाईने ह्या मुलाला दत्तकहि घेतले. संभाजीच्या ह्या कृत्याने बाळाजीचा बेत ह्यावेळी दुसऱ्यांदा फसला. परंतु एवढयाने नाउमेद होऊन बाळाजी स्वस्थ बसला नाही. खानवटकरांच्या घराण्यांतील जो मुलगा जिजाबाई दत्तक घेणार होती त्यालाच रामराजाच्या मांडीवर देऊन रामराजास वनवासास जावयास सांगावे असा बाळाजीचा ह्यावेळी मनोदय होता ( लेखांक २८९ व चिटणिसांची बखर ).ह्या खानवटकरांच्या कुळांतील नवा राजा करण्यांत मतलब असा की पुढे मागे कोणतीहि एक गादी निपुत्रिक झाली असतां ज्या गादीवरील वंश हयात असेल त्याला निपुत्रिक गादीवर हक्क सांगतां यावा व ही दोन्ही राज्ये एक व्हावी. पानिपतची लढाई झाल्यावर नवा राजा करण्याचा बाळाजीचा बेत होता (लेखांक २८९). परंतु बाळाजीला पुढे मृत्यूनें लवकरच गांठिल्यामुळे तो बेत तसाच राहिला. असो. महाराष्ट्रांत अव्वल प्रतीचे घराणे झटले ह्मणजे सातारच्या छत्रपतीचें. त्यांचे महत्त्व कमी करण्यास बाळाजीने वर सांगितलेल्या खटपटी केल्या. येणेप्रमाणे बाहेर मेहनत करून बाळाजीने १७६०त बहुतेक हिंदुस्थान व बहुतेक सर्व दक्षिण जिंकून टाकिली व आंत मेहनत करून सातारचे छत्रपति व त्यांचे राजमंडळ ह्यांस बहुतेक संपुष्टांत आणून आपलें वर्चस्व सर्वत्र स्थापित केले व ब्राह्मणपदबादशाहीची कल्पना खरी करून दाखविण्याचा प्रसंग जवळ आणून ठेविला. पानपतच्या लढाईत पेशव्यांस यश येते तर त्या यशाच्या दरायाच्या जोरावर सर्व भरतखंड महाराष्ट्रमय त्याने करून टाकिलें असतें व बालाजी विश्वनाथाचा वंश ब्राह्मणपदवादशाहीचा आधारस्तंभ झाला असता. तसेंच पानिपतच्या लढाईत पेशव्यांस यश येते तर ह्या दुर्बल छत्रपतींचा मागमूसही न रहाता, असा तर्क करण्यास जागा आहे. कारण पेशव्यांचे महत्व १७५० पासून १७६१ पर्यंत जसजसे वाढत चाललें तसतसें छत्रपतींचें कमी कमी होत चाललें हैं विवेचनावरून दिसून येण्यासारिखें आहे. अर्थात् पेशव्याचे महत्व १७६१ त झेनिथाला जाऊन पोंचले असते तर छत्रपतींचे महत्त्व नाडिराला चाऊन बुडले असते ह्यांत संशय नाही. सातारच्या छत्रपतींना पुढे पुढे कोणी अगदी विचारीत नाहीसे झाले ह्याचा दाखला पाहिजे असल्यास नाना फडणिसाच्या आत्मचरित्रांत उत्तम पहावयास मिळतो. आमीं पेशव्यांचे सेवक, आमास छत्रपतीशी कर्तव्य नाहीं असें नाना फडणवीस लिहितो. ह्यावरून छत्रपतीविषयीं इतरांच्या मनांत किती आदरबुद्धि होती ह्याचें अनुमान करितां येईल. परंतु मराठ्यांच्या दुर्दैवाने तो सुयोग जुळून आला नाही. सामान्य नीतीच्या दृष्टीने पहातां ह्या दुर्बल छत्रपतींच महत्त्व बाळाजीने संपुष्टांत आणिलें हैं बरेंच गर्हणीय आहे. परंतु बुद्धीने व शक्तीने बलिष्ठ अशा पुरुषाच्या किंवा पुरुषांच्या हातांत कोणत्याहि राष्ट्रांची सूत्रे असणे मोठे हितकर असते ह्या