पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/488

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिल्लीत पडला, त्याची चिटी पाठविली आहे. त्याप्रमाणे लिहून पातशहाची जरब मोडून याचे नांवें करणे. हे विनंति. [२५९] हित असतां अद्याप न गेला हे काय ? याउपरि लौकर जाऊन पेशजी लिहिल्या अन्वयें सर्व कामें यथास्थित करणे. याउपरि दिरंगावरी न घालणे. ऐवजाची ततूद केली आहे. निसूर बसला नाही. वरिचेवरी - ऐवज रवाना करीन. याच पत्राचे पाठोपाठ ऐवज येऊन पावेल. विलंब लागत नाही. ह्मणोन भरंवशाने लिहिले ते कळलें. ऐशास पत्र तों येऊन पावलें. ऐवज पाठोपाठ यावयाचा तो कधी येऊन पावेल हे मात्र कळत नाही. येथे खर्चाची निकड आहे हे वारंवार लिहीत असतां तपशील मात्र लिहितां. ऐवज येत नाही. हे कामाचे नसे. याउपरि दिरंग न लावितां ग्वालेर, आगरे, मथुरेवरून ऐवज दिल्लीस येई ते करणे. विलंब न लावणे. जाट बलमगडास आहेत. तिकडून रसदेचा वगैरे पेंच पडावयाचा नाही. त्याची फौज पुत्र हुजूर येणार. ते येथे राहून पलीकडे पायबंद द्यावा. तिकडन तुह्मीं फौज सुद्धा जाऊन शहावरी असावें. इकडे यमुनेचे पाणी हलकें होतांच अबदालीचें पारपत्य यथास्थित करावे, असा डौल आहे. त्याजकडून तहाचे राजकारण अद्याप आहे, परंतु मळमळीत आहे. ठीक नाही. येथील मर्जीनरूप जाहल्याशिवाय तह होणार नाही.. प्रस्तुत आह्मी दिल्लीहन कुच करून दोन मजली ललेन्यास कुंजपु-याचे सुमारे आलो. पढ़ें जाऊं. अलीगोहर याचे पुत्र बाहेर काढून वलीहद्दी करावी, हा निश्चय होऊन शुक्रवारचा मुहूर्त करार केला आहे. होईल तें मागाहून लिहिले जाईल. ऐवज लौकर पाठविणे. सारी कामें लिहिल्याप्रमाणे यथास्थित करणे. + अलीगोहरचे पुत्रास वलीआहद शुक्रवारी केले. गजाशक्का ११४ हे पत्र असेंच अर्धे मधे सांपडले. ह्या पत्राचा पहिला व तिसरा बंद नाही. ३१५ छ ३० सफर ह्मणजे १० अक्टोबर १७६०.