पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/487

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फिरविली. त्याचे पुत्रास बाहेर काढून वलीहैद केले. सर्व अलमास खुशाली नाहली. लोकांनी नजरा केल्या. शिक्के चालते जाहले. मोठा समारंभ केला. तुह्मांस कळावे ह्मणोन लिहिले असे. आमी कुंजपु-याकडे गेलो. इकडे अबदालीचे कुच होऊन आलियावरी उत्तमच जाहले. दिल्लीकडील मुलुख मागे मोकळा राहिला. इकडेच लढाई पडेल. कदाचित् ते इकडे न येतां तिकडे तुमचे रोखे जाहले तरी बरंच आहे. आमी पाठीवरी यमुना उतरून अंतरवेदींतोन येऊन पारपत्य करूं. कुंजपुरेवाला ठेहरत नाही. डावा डोल होऊन दमवायाच्या मुद्यावरी आहे. ठहरला तरी मोर्चे लावून यथास्थितच पारपत्य करूं. तुह्मी तिकडे सत्वर जाऊन पोहोचणे. केवळ छोट्या मोठ्या कस्मास गुंतोन न राहणे. ऐवज लौकर येऊन पावे ऐसा रवाना करणे. दिरंग न लावणे. + तुह्मीं पेशजी लिहिलेप्रमाणे गनीमी मेहनत करून रोहिले सुज्यादौला यांचे प्रांतांत धामधूम होई असें करणे. किरकोळ गढियांचे कामास न गंतणें. अबदाली आह्मांकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे तो आहे. चार रोजांत कुंजपुरियाचें पारपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढे अबदालीचे पाठीवर येऊ. रवाना छ ४ लावल. बहुत काय लिहिणे. अलीगोहरचा शिक्का ३१३ १७५९च्या नोव्हेंबरांत गाजुद्दिनाने अलमगिरास ठार मारिलें व औरंगझेबाचा पुत्र कामवक्ष ह्याच्या पुत्रास ह्मणजे शहाजहानास तख्तावर बसविलें. इतक्यांत अवदालीची गडबड झाल्यामुळे गाजुद्दिनाला मराठ्यांकडे पळून जावें लागून ह्या शहाजहानास कोणी विचारीतनासे झालें. अबदाली सवंद १७६० साल अंतर्वेदीत होता; परंतु, त्याने कोणी नवीन पातशाहा स्थापिला नाही. भाऊसाहेब दिल्लीस आल्यावर त्यांनी पट्टणास पळून गेलेल्या अलीगोहरास पातशाहा करून त्याचे नांवें गजशिक्के केले व त्याचा पत्र जो जवानवस्त त्यास वलीअहद ह्मणजे युवराज केले. भाऊंनी विश्वासरावाला तख्तावर बसविले हाणन मल्हारराव होळकर लिहिता, असे ग्रांटडप ह्मणतो. विश्वासरावाला तख्तावर बसविल्याबद्दल एक शब्दहि होळकरांच्या कैफियतींत नाही. तेव्हां मल्हारराव होळकराने पानिपतच्या लढाईची हकीकत दुसऱ्या एखाद्या लेखांत लिहिली असली पाहिजे. हाच लेख बहशः होळकराची थैली ह्मणून ज्यास ह्मणतात तो असावा. सदर थैली काव्येतिहाससंग्रहकारांस मिळाली होती, परंतु ती हरवन गेली असे कळतें.