पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६१ लिहिला आहे. त्याणी कजिया केला नसेल, व हल्लींहि कजिया न करणे. त्यास समजावून सांगोन फौजसुद्धां हुजूर घेऊन येणे. ह्मणोन लिहून पत्रे रवाना केली आहेत. याप्रमाणे करितील. पारच्या जमीदारांना कजिया मानवला आहे. शेपन्नास ठाणे रोहिल्यांचें घेतलें ह्मणोन लिहिले तरी उत्तम आहे. या उपरिहि वारंवार पारचे राजकारण ठीक राखून लेहून अतिशय बखेडा करीत ऐसें करणें. तिकडील सूत्र पक्के चांगले तन्हेने हाती राखणे. गंगाकिनारा आज्ञेप्रमाणे जातो ह्मणोन लिहिले, तरी बहुत दिवस तुझांस ( लिहा ) वयाचें समाप्त केले. सीमा झाली. तुझी थोर माणूस वारंवार काय ह्मणावें. करून दाखवाल याउपर तें खरें. र॥ छ १ लावल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२५८] ॥ श्री॥ १४ अक्टोबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांस तिकडे मोठ्या कामास जावयाविषयी वारंवार लिहिले. परंतु अद्याप राजश्री गोपाळराव गणेश व तुही गेला नाही. कोठे किरकोळ जमीदारांची गढी गांव घेत बसला आहां है ठीक नाही. याउपरि लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणे गडबड करून धुंद उडवणे. या गोष्टीस हयगय एकंदर न करणे. आह्लीं यमुनेचे पाणी फार याकरितां दिल्लीवरी बसोन उपयोग नाही. यास्तव कुंजपुन्यास जाऊन अबदुलसमदखान याचें पारपत्य करावे, या अर्थे दरकुच जात आहों. चिरंजीव राजश्री नाना, आपाजी जाधवराव यास दिल्लीस पाठविले. त्यांनी छ ३० सफरीं अलीगोहर याचे नांवचे गजशिक्के केले. शहरांत द्वाही