पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

રૂપ૮ आले. त्यावरून तुह्मांस लिहिले आहे. तरी तीन सालांचा वर्षासनाचा ऐवज नेमणूका। दीक्षितांकडे श्रीमध्ये पावता करून कबज जाणून पाठवून देणे. या गोष्टीस आळस सहसा न करणे. याखेरीज श्रीमध्ये दीक्षितांकडे अनुष्ठानाचे खर्चाबद्दल रू॥ १५००० पंधरा हजार देविले आहेत, त्याची वरात अलाहिदा पाठविली आहे. तो ऐवज पत्र पावतांच जलदीने श्रीस पोहचायून कबज जाणून पाठवणे. जाणिजे. छ १७ सफर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणे. वारंवार ताकीद असून धर्माचा ऐवज न पावणे, अपूर्व आहे! आतां दिवाळीपर्यंत वर्षासनाचा पहिले॥ देखील सालमजकूर व जाजती दहा हजार, सनद पेशजी पावली त्या॥, व हाली अनुष्ठानाचे पंधरा हजार दीक्षितांजवळ पावते करून कबज येथे घेऊन पाठवणं. हे विनंति. बार. [ २५३] ॥ श्री॥ २७ सप्टंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुहीं विनंतिपत्रे श्रावण वद्य १४ ची पाठविली ती भाद्रपद वद्य द्वितीयेस पावली. चिरंजीव राजश्री भाऊंकडील व पठाणाचें व सुज्याअतदौलाकडील व अलीगोहर शाहाजादे याकडील वर्तमान विस्तारे लिहिले ते कळले. याउपरिहि तिकडील वर्तमान विस्तारें वरच्यावर लिहीत जाणे. या दिवसांत तिकडील मनुष्याचा अर्थ विस्तारें जलद लेहन यावा. तदनुरूप त्वरेने सर्व लिहीत जाणे. जाणिजे. छ १७ सफर, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. हे विनंति. ३१२ गोविंदपंतावर हा एक आणखी आरोप आहे.