पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५९ [२५४ ] ॥श्री॥ २९ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. बद्दल देणे राजश्री नारो शंकर यास पथकास समजावीस नालबंदीचे ऐवजापैकी रुपये १००००० येकून एक लक्ष रुपये तुझांकडून देविले असेत. तरी प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजी कार्तिक मार्गशीर्ष दोन महिन्यांत पावते करून पावलियाचे कबज घेणे. जाणिजे. छ १९ सफर, सु।। इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २५५] ॥ श्री ॥ ७ आक्टोबर १७६०. चिरंजीव राजश्री गंगाधर यासिः गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरि येथील कशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वर्तमान सायंत कळले. त्यास चिरंजीव सौ॥ लक्ष्मी प्रसत झाली. कन्या झाली. फार उत्तम झाले. आह्मी बिठुराहून कूच करून रीप नदीवर आलो. गुलोलीचे मामलियाकरितां एक दोन मुकाम करून फडशा करून दरमजलीनी उमरगडी येऊन. आतां गुंता नाही. वरकदा भेटीनंतर सविस्तर बोलोन. अबदालीकडील दोन हजार फौज लुटविली, कंजपुरेयाजवळ. कुंजपुरा घेरिला आहे. बहुधा घेतला असेल. आमी सत्वरच रोकन गलोलीवाले याने सन १८१६ पैसा न दिल्हा. गडी बांधोन राहिला. जर याजला सोडून आलों तर तसेंच राहील. तूर्त ऐवज कांही हाती येणार ह्मणन मुकाम केला. सत्वरच फडशा होईल. मोहनसिंग गुलोलीवाला दमला. रमईपुरी गेला. त्याचे मातबर भले माणूस येऊन भेट्न गेले. उदर्डक सर्व येतील. फडशा करून मी येतो. मित्ती भादो व॥ १४. हे आशीर्वाद