पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/482

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें पावले. राजश्री राजे प्रिथीसिंग हे सरकारांत बहुत निष्ठेनें वर्ततात. दोघे चिरंजीव फौजसुद्धां राजश्री गोविंद बल्लाळ याजकडे चाकरीस गेले आहेत. यांणीहि इकडे सरकारकाम सिद्धवाटेचे ठाणे राघो गोविंदाकडील मवाशियांनी घेतले होते तेथे हे आह्मी मिळोन जाऊन ठाणे घेतले. दहावीस माणूस प्रिथीसिंगाचे जखमी जाहालें. पांच सात ठार जाहालें. ठाणे घेऊन आमचे हवाली केले. ह्मणोन कितेकप्रकारे त्याचे निष्ठेचे वर्तमान लिहिलें तें कळलें. ऐशास, त्यांणी निष्ठेनें वर्तावें व वर्ततात यांतच सर्वा गोष्टीने त्यांचे बरे आहे. याउपरिहि तुझी त्यांस सांगोन सरकारकार्यांत सादर राहात तें करणे. ठाणे आपलेकडे आहे ते कोणाकडे द्यावयाची आज्ञा करावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, ठाण्याचा म॥र तरी मागाहून लिहिला जाईल. तूर्त तुह्मांकडे असो देणे. प्रिथीसिंग निष्ठनें वर्ततात बरेंच आहे. त्यांचे चिरंजीव तिकडे गोविंदपंताकडे गेले आहेत. याणींहि फौजसद्धा या समयीं येथे यावे. ह्मणजे निष्ठा विशेष वाढेल ! तरी तुझी सांगोन त्याजला, फौजसुद्धा इकडे येत तें करणे. छ १५ सफर. ( लेखनसीमा ). [ २५२ ] ॥श्री॥ २७ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. श्रीमध्ये ब्राह्मणांची वर्षासने आहेत. त्यांचा ऐवज झाडून वे॥ राजश्री बाळकृष्ण दीक्षित यांजकडे पावता करणे व दहा हजार जाजती देणे ह्मणोन दोनचार वेळ तुह्मांस लिहिले. त्यास दोन साला वर्षासनाचा ऐवज दिल्हा व दहा हजार रु॥ जाजती दिल्हे, तीन साला वर्षासनाचा ऐवज राहिला तो अद्याप पावला नाही, ह्मणोन दीक्षितांचें पत्र