पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/481

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पत्र पावेल तेंचक्षणी येणे. दोन राहटिया लहान लहानशी घऊन येणं. चार कनाता घेऊन येणे. एक शेतखाना, भांडी अगत्य अगत्य घेऊन येणे. विलंब न करणे. मित्ती भादो शद्ध ११. हे आशीर्वाद. महिरा दहापधरा घऊन येणे. हे आशीर्वाद. तमांसहि पत्र जासदासमागमें प॥ ते पावलेंच असेल. पत्र पावतांच तह्मीं स्वार होऊन येणे. हे विनंति. रा. रामचंद्रभटजी सुखरूप आह्माजवळ पावले. हे विनंति. पत्र पावतांच निघान यण. नाहीं तर द्वितीयेस श्राद्ध आहे. त्यास येऊन तर विलंब लागल. याजकरितां तुह्मीं येणें. पत्र पावतांच येणे. हे आशीर्वाद. [ २५० ] ॥श्री॥ २ सप्टेंबर १७६०. विनंति उपरि. सविस्तर लिहिलेच आहे. मांहि ताकीद केली आहे. वरचेवर चिरंजीव बाबापासून ताकीद करवून हिसेब आणवणं. करालीकड, याकडेहि ताकीद लिहून पाठविली. तुह्मींहि ताकीद करणे. आह्मीहि करिता. पंधरा रोजांत सर्व येतील आणि आमीहि इकडून फडशा करून येतो. आणि श्रीमंत ॥ भाऊ स्वामीकडे जाऊन काय करावे ? मागील पुढील कजिये होते. डुडी होती. नाही तर आसीहि रोज भेटावयास श्रीमंत स्वामीस जाहों. आतां तुह्मींहि मेहेनत केलीत आहे. त्यास पंधरा रोजांत सर्व फडशा होऊन येईल आणि गुंतेहि वारतील. सर्व निर्मळ होईल. वरचेवर लिहीत जाऊन. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [ २५१ ] ॥श्री॥ २५ सप्टेंबर १७६०. अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री विसाजी गोविंद गो॥ यांसिः सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार. सु॥ इहिद सितैन मया व अलफ.