पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांत राहिली नाही. दहा हजार घोडे, उंट, खचर अनुप शहरी मेले, नित्य मरतात. ईश्वरकृपेनें श्रीमंत स्वामीचे दैव थोर. आणि श्रीमंत र॥ भाऊ स्वामी यशस्वी आहेत. सर्व उत्तमच होईल. आह्मी सत्वरच येतो. चिरंजीव ॥ गंगाधरबावास सत्वर पाठविणे. वरकड जें वर्तमान येईल तें वरचेवर लिहून पाठवून. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. अबदालीचे घरीं मनसुबा जाला, मराठे यांसी सलुख करून वजीर गाजदीखान बकशी अहमदखान यासी करार करून आपले देशास जावें या मनसुबयात आहेत. हे विनंति. [ २४७] ॥ श्री॥ २१ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ भादो सुध ११ मु॥ गुलोली जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. कपिलाषष्ठी महापर्व आहे. चिरंजीव बाबास आणविलें आहे. सडे येतील. तुझींहि येणे. वरचेवर स्नान करून येऊन मौजे गलौलीस लागलो. तेथली शनवारी फत्ते झाली. आणीक दो गडी खाली झाली. येक दोन राहिली ते आज खाली होतील. सत्वर सर्व येणे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [२४८] ॥श्री॥ २४ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून