पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/478

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २४६] ॥श्री ॥ २१ सप्टेंबर १७६०. प॥ राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः विनंति उपरि. दिल्लीहून वर्तमान आले जे मराठे यांची फौज दिल्लीस येऊन जो फौजदार अबदालीचा होता याकूब अल्लीखान तो मात्र नावेवर बसोन पार होऊन पळाला. वरकड स्वार प्यादे चार पांच हजार मारले गेले. श्रीमंत स्वामीचे ठाणे दिल्लीत बसले. घाट यमुनेचा आगरेयापासून कुंजपुरेयापावेतों श्रीमंत स्वामीचे हाती लागले. याउपरि वर्तमान येत जाईल ते लिहून पाठवून. चौथे रोजी सुजातदौले अबदालीजवळ गेले. त्यांजला अबदालीने सांगितले की तुह्मी मातबर. दोन करोड रुपयेयाचा मुलक तुह्मांखाले. त्यास मी हैराण, मजवर शिपाई यांची तलब चढली, याची तजवीज करून देणे. याप्रमाणे बोलतांच सुजातदौले सखेद जाहले. त्याजवर शाहावलीखान वजीर याजकडे गेले की मी तुमचे इमानावर आलो. आतां हे काय ? त्यास शाहानवाजखान याणे जबाब दिल्हा की तुह्मी लुच्चयाचे सांगितल्यावरून आला. नदी उतरून कोण तुह्मांवर येत होता ? आह्मीं तुह्मांस इमान पाठविले नाही. जसे आला तसे अबदालीस राजी करा. त्याजवर फजीत होऊन डेरा आले. नजीबखानानें अबदालीस सांगितले की तमचे कार्याकरितां सोय जशी सुजातदोले याणी मागितली त्याप्रमाणे करून घेऊन आलो. आतां रुपये घेणे, सोडणे. हे वर्तमान सुजातदोले यांस कळलें. नजीबखानाशी व सुजातदौले याम बिगाड झाला. सुजातदोले यास करोड रुपये तूर्त मागतात, हे वर्तमान घनसुंदरदासाने लिहिले आहे. घनसंदरदास यास सुजातदोले याणी नेऊन सर्व सांगितले की मजला नजीबखानाने फसविले. मजला श्रीमंत राजश्री भाऊस्वामींनी व सरदारांनी व गोविंदपंतांनी, माझे आईनें, सर्वांनी सांगितले की तुह्मीं न जाणे. त्याचें न आइकोन या कुंटणाचे बोलास लागोन आलो. फजीत पावलों. सारांश फजीत जाले. अबदालीचे लष्करी गडबड जाली. सर्व लहान थोरांनी मराठे यांसि सलूख करून आपले देशास जावे हा मनसुबा आहे. याजउपरि लढाईची हिंमत