पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/477

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यावा. न येई तरी मुलूख मारावा. हे केलिया मोठे काम आहे. तुझी आतां केवळ माहालकरी नव्हा. सरदारासारखी तुझाब॥ फौज आहे. पांचसात हजार सडे फौजेनें रात्रंदिवस गनीमी करून रसद कुमक येईल ते मारावी. जौटाचेहि जवळ कुमकेस आहेत. या॥ जालिया मोठे काम आहे. तरी जरूर करणे. ऐवज रवाना करणार तो सत्वर ग्वालेरीवरून येऊन पोहोचे, दोनचारशें राऊत शाहाणा माणूस पैक्याब॥ देऊन रवाना करणे. प्रस्तुत तुमचेच ऐवजाचा भरवसा आहे. ॥छ ८ सफर. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२४५ ॥ श्री॥ १९ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. अबदालीचे पारपत्यास चिरंजीव राजश्री भाऊ व विश्वासराव गेले आहेत. राजे हिंदुपत याणी आपले फौजसुद्धा जाऊन सामील व्हावें. येविशीं चिरंजिवाची पत्रे त्यांस येत असतां अद्याप जात नाही हे त्यांस उचित् नाही. तरी तह्मीं हिंदुपतीस बहुत प्रकारे समजाऊन सांगून फाजसुद्धा सत्वर निघोन जात ते गोष्ट करणे. श्रीकृपेनें पठाणाचें पारपत्य चिरंजीव करीतच आहेत; परंतु, हिंदुपत जाऊन न पावल्यास त्यांचे कल्याणावह नाही. असें त्यास सांगून त्यांचे जाणे सत्वर होय तें करणे. जाणिजे. छ ९ सफर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ.+बहुत काय लिहिणे. हे विनंति. ३१० ह्यावरून जाटाचे व भाऊंचे अद्याप वाकडे आले नव्हते.