पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/476

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५१ सविस्तर लेहून पाठवणे. इकडील वर्तमान काही अधिकोत्तर ल्याहावें ऐसे नाही. तुह्मास पेशजी एकदोन वेळा लिहिले होते जे तुही फौजसुद्धां गंगाकिनारा सोरबच्या घाटाजवळ जाऊन राहाणे. पलीकडे रोहिले सुजातदौलाच्या मुलकांत उतरावयाची आवाई घालणे. तिकडे गडबड करणे. बुणगे उमरगडी टाकून सडी दौड लांबलांब करावी. रसद अबदालीच्या लष्करास जाते ती लागभाग पाइन मारावी, लुटावी. पलीकडील जमीदारांस कुल बीर देऊन हाती घ्यावे. त्याजकडून उपद्रव करवावा. येणंग्रे॥ तुह्मास लिहिले होते. याअन्वयें तुह्मी व राजश्री गोपाळराव गणेश मिळोन तिकडे गेला असालच व लिहिल्या डौलाने करीतहि असाल. कदाचित् नसिला गेला तरी याउपरि तन्ही लौकर जाऊन सोरमच्या घाटास दाखल हाण, विलंब न लावणे. योविशीं गोपाळराव गणेश यांसहि लिहिले आहे. ते तुह्मापाशी फौजसुद्धा येतील. तुझींहि त्यांस लिहून आपणापाशी आणणे आणि हे काम करणे. व जे लोक अबदालीकडील इकडच्या राजकारणाने निघोन येतील त्यांस तुह्मीं जागा देऊन ठेऊन घेणे. इकडे रवाना करणे ऐसेंहि पेशजी लिहिले होते. त्यावरी येथून कोण्ही तुमचे नावची पत्रे घेऊन गेले आहेत, तुह्मांस पत्र सरकारचे आणून देईल, त्यास जागा देऊन जमा करणे, इकडे पाठवणे. वर्तमान वरिचेवरी लिहीत जाणे. ऐवज पोख्ता जमा इतके दिवसांत तुही केलाच असेल. तरी सत्वर ऐवज पाठवणे. विलंब एकंदर न लावणे. + तुझी, मोपाळराव, जमीदार आठ दहा हजार जमा व्हाल. इकडे आणल्यास रान मोकळे पडेल. फारकरून माहाली फौज राहन दोनतीन हजार येईल. तिकड पेंच पडल्या माहाली राहील फौज त्याच्याने बंदोबस्तहि राहणार नाही. यास्तव तुहीं आपला तालुका मागे टाकून, राजे जमीदार जमा करून, सडे फौजेनें सोरमकडे येऊन, पलीकडे दौरत घालावी. जमीदार वगैरे पलीकडील फिसाद उठवावी. सादुल्ला, फैजुल्ला रोहिले यांकडे सूत्रहि करावें. फौजेचा दबाव दुपट पडेल. घरोघरचे येणार ते येणार नाहीत. नंगसहि लगाम लावील तर सलूख राखावा. येथून उठवन