पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हजार फौज असोन पंचवीस लाख रुपये खात असतां, खावंदांस कामाची निकड असतां तुझी लटके बहाणे करून मुलकांत रहावें हे गोष्टी तमांस योग्य नाही. खावंद वारंवार लिहितात, तुह्मी गढी कोटाचे बहाणे लिहितां हा सेवक लोकांचा धर्म नव्हे. पत्र श्रीमंतांचे पावतांच शिताबी करून येणं. प्रसंग उरकल्यावर आलेत तर काय कामाचे ? + याउपर श्रीमंतांनी आमांस रागें भरोन दोन चार पत्री तुझाविषयी लिहिले की तुह्मीं त्यांस लेहन फौजा लौकर येऊन समयीं उपराळा होय तें करावें. तरी आपण या समयीं दरोबस्त फौजा व जमीदार समागमें घेऊन राजश्री गोपाळराऊ वगैरे त्याच प्रांतींचे श्रीमंतांचं अन्न खाऊन दौलत कमाविता. सर्वांनी जमा हाऊन सत्वर यावें. नाही तरी परिच्छिन्न शब्द लागेल. श्रीमंताची व मोगलाची दो ती कोसांची तफावत. एकदोन रोजांत युद्ध तुंबळ होऊन श्रीस करणे ते होईल. परंतु श्रीमंतांचे हिमतीस तारफ कोठपर्यंत लिहावी ! सफजगीस कांहीं बाकी नाही. बुणगे कबीले सर्व बराबरच आहेत. ऐसे निदान आरंभिलें आहे. आह्मी किल्ले मजकूरचा बंदोबस्त करून दीड हजार फौजा मोगलाचे लश्करवर जवळ कनोजीस ठेवून घोडी उंटें आणितात. व हजार स्वार प्यादा फार उतरोन धामधूम मांडिली. रमदाह बंद करविली आहे. ऐशा समयीं आपण फौजांसुद्धां आलिया श्रीमंतास बहुतच समाधान वाटल. जरूर रात्रीचा दिवस करून, लांब मजली करून लोकर लौकर येणे. विलंब न करणे. बहुत काय लि. हे विनंति. २४४ाम ॥ श्री॥ १८ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. अलीकडे तुमचे पत्र येत नाही, तरी