पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/474

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरतूद होऊन येई. मक्ता होता तेव्हां मेहनत लावणी करीत होता. कमावीस झाली, आमचे येणें झालें. आतां लावणी पाडून तोटा नजरेस पडेसा करावा, असा शब्द न येई. चांगले काम सरकारचे होय तें खातरजमेने करणे. ऐवज जरूर पाठविणे. तुमचे येणे तूर्त उत्तम नाही. तिकडे सुज्यादौलाचे जमीदार अंतस्ते नीट करून ठेवणे. सोरबचे घाटी नावा जमा करून रोहिल्याचे मुलकांत दबाव देणे. यामुळे रोहिले घरी गेले ते येणार नाहीत. येथे आहेत ते मागे पाहतील. अबदालीचे फौजेतील काही लोक उठन येणार. दहा पांच हजारांची राजकारणे आहेत. तेहि तुह्मांकडेच जमा होतील. आपले मुलकांतहि दबाव राहील. असे कितेक उपयोग. यास्तव लिहिले॥ करणे. इकडे न येणे. बंगसचे मुलकांत पुरता पायबंद देणे. ऐवज जरूर पाठवणे. मोठी मामलत असोन अगदी ऐवज न यावा हा त॥ कामाचा नाही. जरूर पाठवणे. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२४३ ] श्रीगजानन ७ नोव्हेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंदपंत दाजी स्वामीचे शपेसीः पोण्य नारो शंकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि यर्थाल क्षेम नछ २७ ॥वल पावेतों मुकाम इंद्रप्रस्थ कुशळरूप जाणून स्वकाय कुशळ लिहीत असले पाहिजे. याउपरि श्रीमंत राजश्री भाऊसाहेबानी आपणास पहिली पांच चार पत्र पाठविली. सांप्रतहि मुजरद बहुत निकडीने पत्र लिहिले आहे. पत्रावलोकनी सायंत कळेल. दाजीबा, आमांसहि आपण सत्वर येत नाही ह्मणोन बहुत प्रकारे लिहिले आहे. अशा समयास आणीक सर्व कामं एकीकडे ठेवून रात्रीचा दिवस करून चाकरी करून दाखवावयाचा प्रसंग असतां, तुह्मी यावयास ढील करितां, यावरून काय ह्मणावें ? पत्र पावतांच जेथे असाल तेथून कूच करून दुमजला येऊन पोहोचणे. तुह्मापाशी दहा