पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जात नाहीत. आझांकडून दोनचार मुजरद पत्रे सेवेसी गेली आहेत; परंतु, उत्तर येत नाही. मार्ग चालत नाही, यास्तव येऊन पावत नसतील. खिमाले कासीद पाठविला, चार महिने झाले, परंतु जाब येत नाही. त्याची गती काय आहे ईश्वर जाणे. सर्वदां पत्रीं कुशलार्थ ल्याहावयास आज्ञा करून सेवकास आराम होय तें करावें. इकडील वर्तमान सेवेसी वरचेवर लिहीत जाईन. सेवेसी श्रुत होय. हे विनंति. समस्त मंडळीस साष्टांग नमस्कार. लोभ कीजे. हे विनंति [ २४२] ॥ श्री॥ ५ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयं कुशल लिहीत जाणे. विशेष. तुही अंतरवेदीतील वगैरे तालुकियाची लावणी संचणी करावयास अनमानसा करून हेलसांड करितां. मामलत आपल्याकडे राहणार नाही हा संशय धरितां. कमाविशीचा मामला सबब कमी यावी, ऐशा डौलाने हयगय करिता. ह्मणोन बारीक बारीक शोध करितां विदित जाहलें. ऐशास, तुही तों असें न करालच हा भरंवसा आहे. परंतु आपलेच तर्काने एखादी भलती गोष्ट चित्तांत समजोन डावा डौल व्हावें ऐसें नसावें. याउपरि रयतेस दिल भरंवसा चांगला देऊन लावणी संचणी यथास्थित होय. पडली जमीन बिघराचा बिघा असेल तेहि लावणी होय. तुझी पेशजी बोलला आहां त्याप्रमाणे निदर्शनास येईल ऐसे करणे. काणेविशी कोणाचे सांगितले चित्तांत न आणितां बंदोबस्त ठीक करणे. पेशजी कित्येक कामें काजें तुह्मांस लिहिली आहेत त्याप्रमाणे ठीक करणे. + जाणिजे. छ २४ मोहरम सुमा इहिदे सितैन मया व अलफ. लावणी करून. जमा सावे. तुमचे बोललेप्रमाणे