पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२४० ॥श्री॥ ४ सप्टेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणान स्वकीय लिहीत जाणे. विशेष. ब।। देणे अजुरा खर्च मोहनभाई वगैरे यांजबरोबर श्री गंगाजळ कावडी प्रयागीहून वे॥ दीनानाथ प्रयागवळ याणी पाठविल्या होत्या त्यास अजुरा रुपये. २४० गंगाजळ कावडी ४० दर ६.. ६४ मिटै व अनार कावडी ८ दर ८. २० गुलकंद कावडी २ दर १० ॥. ३२४ येकूण तीनशे चोवीस रुपये तुझांकडून देविले असेत, तरी प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजी पावत करून पावलियाचे कबज घणं. जाणिजे. छ २३ मोहरम सु॥ इहिदे सितैन मला व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनात. [२४१] ॥ श्री॥ ४ सप्टेंबर १७६०. सवेसी०५ विज्ञापना मोहन ब्राह्मण मुजरद कावड देऊन अंताबाच्या .. घरास प॥ आहे. त्याचे घरचेंहि बहुत दिवस वर्तमान कळत नाही. त्यास, दोन माणसे आपलींहि याजबराबर देऊन वर्तमान आणवून लेहून पाठवलें पाहिजे. खर्चास कांहीं प्रविष्ट करावें. आजपर्यंत समस्त सुखरूप आहों. पुढे निभावून येऊन स्वामीचे पाय अवलोकन स्वामीच्या पुण्यप्रतापं होईल. शाहाजादा, सुज्यानदौला कुन्यानजीक अद्यापि आहेत. पुढे काही दिल्लीकडे ३०९ पत्र कोणे कोणास आहे ते समजण्यास मार्ग नाही.