पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/471

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २३९] ॥श्री ॥ ३ सप्टेंबर १७६०. पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. यंदा तुह्मांकडील प्रांतांत दंगा जाहला, तो फार करून सरदारांकडीलच तालुकियांत. किरकोळी सरकारच्या तालुकियांत जाहला. सध्या तो तुह्मीं शत्रुकडील ठाणी अमल उठवून आपली कायम केली. आतां लावणीचे दिवस. रयतेस दिलासा देऊन तगाई देऊन लावणी या दिवसांत करावी, त्यास दिरंग दिसतो. बुंदेलखंडांत तो कांहींच पेंच नसतां तिकडीलहि लावणी रयतेची दिलभरी नाही यामुळे पुढे नुकसानी येणार, ऐशी वर्तमानें येतात. त्यास तुह्मांसारिखे मुलखाची आबादी करावयास दुसरे कोण ? तुह्मी बारगीर सरकार किफायत गैर किफायत समयासमयास चित्तांत आणून किफायतीची कामें करीत आलां पुढे त्याचप्रमाणे करावी. ऐसें असोन तुह्मांकडील तालुकियांतील ऐशी वर्तमानें यावी उत्तम नाही. या उपरि बुंदेलखंड वगैरे आपल्या तालुकियांत तमाम रयतेची दिलभरी करून लावणी होय तें करणे. येविषयी आपणांकडील तालुकदारांसहि वरचेवर ताकिदा लिहून पाठवून लावणी होऊन नुकसानी न ये तें करणे. या वर्तमानावरून असे दिसोन येतें की लावणीस कमती करून खावंदास तोट दाखवावा. परंतु तुह्मी असे न व्हां. तुह्मांपासून सरकारनफाच व्हावा. मक्त्याचा मामला असोन ज्याप्रमाणे लावणी रयतेचा दिलासा करून पैसा साधतां मोठ्या खाजगत संसाराप्रमाणे चित्तांत आणून खावंद किफायत करावी. करणे. कोणे महाली कशी तगाई देऊन लावणी केली हे तपशिलवार लिहून पाठविणे. रवाना छ २२ मोहोरम. बहुत काय लिहिणे. हे विनति GENERAL सार्वजनिक बालय) खेड, (तु.) ३०८ धन्याचा तोटा करण्याची गोविंदपंताची ही खुबी लक्षात न्यासारखी आहे ।