पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/470

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येणार ते तिकडे येतील. पत्र घेऊन येईल तो खरा. यापाई तकरार नाही. सावधता बातमी राखीत जाणे. आमी आलियावर तुझी फार तरतूद करणार असें बोलत होतां तें बहुधा विसरलासे वाटते. मातबर मामला सहा महिने लिहितां भागलो. दोन लाख रुपये आले हे उत्तम की काय ? जरूर रसद वगैरे दहा पंधरा लाख सत्वर पोहोचावणे. हिशेब विल्हेस लागला त्याची नकल व सबात बेहेडा पुढील केला व पुण्याहून जाजती जमा व खर्च लिहून अजमास लिहून पाठविले त्याच्या नकला व कमाविशीपासून तुचा हिशोबाचा अजमास सत्वर पाठविणे. अजमास तयार नसला तर मागील बेहेडे व हुजूरचेच अजमास सत्वर पाठविणे. मागून तेहि पाठविणे. तिकडे काम मातबर. तुझी इकडे न येणे. लिहिलेप्रमाणे तरतूद करणे. रवाना छ २१ मोहोरम. बहुत काय लिहिणे. गोपाळरावहि तुह्मांजवळ येतील. त्यांचें व शहाजादियाचें वर्तमान लिहीत जाणे. हे विनंति. [२३८] ॥श्री॥ २ सप्टेंबर १७६०. परवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. आज छ २१ मोहरमी संध्याकाळीं अबदालीकडील राणी वगैरे लोक पांच सहा हजार तयार होऊन गाजुदी नगरच्या रोखें गेले: ऐसी बातमी जासुदाचे जबानीवरून कळली. त्यावरून तुह्मांस लिहिलें असे. तरी तुह्मी आपले जागां सावध राहणे. न कळे कदाचित तिकडे आले तरी येतील. यास्तव सावध खबरदारीने राहून लांबवरी बातमी चांगली राखीत जाणे, वर्तमान लिहिणे. जाणिजे. छ २१ मोहरम. हे विनंति. ३०७ सबाखमसैनांत.