पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/469

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४४ तात, परंतु मोगली लोकांचा विश्वास नाही. यास्तव तही तेथे जवळोन असिल्यास याच्याहि मुलखांत शह पडेल. याची वर्तणुक ठीक न जाहलिया मुलखाची जफ्ती अगर जमीदारांकडून फिसाद करावयास येईल. सर्वां गोष्टीने ठीक पडेल. बंगसाकडील व सादतखान अफरादी वगैरे याजकडील राजकारणे आली आहेत जे आह्मी येथून हरएक बहाणा करून तिकडे निघोन जाऊन गोविंद बल्लाळ यांजवळ जमा होऊ. ऐसें आहे. यास्तव जो त्यांचा सरदार तुह्मास सरकारचे पत्र घेऊन येईल त्याजला आपल्याजवळ जमा करून ठेवणे. इकडे हुजूर येऊ म्हणतील तरी हुजूर पाठवणे. याप्रमाणे येतील त्यांचा बंदोबस्त करणे. तुम्हाकडे यावयाविषयी राजश्री गोपाळराव गणेश यांस लिहिले आहे, तेहि फौजसुद्धा येतील. तुझी त्यांनी मिळोन गंगाकिनारा धरून पलीकडे दुबावास राहवें. ह्मणजे पलीकडील येणारास पायबंद बसून येऊ पावणार नाहीत. नावांचाहि बंदोबस्त करणे. बारीक मोठे वर्तमान होईल तें वरिचेवरी दो दिवसा आड लिहून जोडी हुजूर पाठवीत जाणे. चहूंकडील बातमी राखून लिहिणे. ऐवजाकरितां तुह्मांस वारंवार लिहितो, परंतु अद्यापि ऐवज येत नाही. येथें तो खर्चाची ओढ फार झाली आहे. तुझी तपशिल मात्र लावून लिहितां हे कामाचें नाही. मसलतीच्या प्रसंगी तुझी या प्रसंगी तपशील लावू लागला तरी कसे ठीक पडेल ? हे सर्व बारीक नजरेनें उमजोन ऐवजाची तरतूद सत्वर करून मातबर ऐवज पाठवून देणे. येविषयीं हयगय परिच्छिन्न कामाची नाही. तुमचा हिशेब पुण्यांत होऊन विल्हेस लागला आहे. या अलीकडील सर्व अजमास हुजूर पाठविणे ह्मणून पेशजी लिहिले असतां अजमास येत नाहीं हे अपूर्व आहे. या उपरि पुण्यास हिशेब होऊन ताळेबंद करून दिला आहे तो व त्याजपासून आजपावेतों अजमास ऐसें सत्वर पाठविणे. विलंब न लावणे. + सोरमचे घाटी पुलाची अवाई करणे. बंगसाचे मलखांत उपद्रव करणे. येथून बंगस आफरिदी बहाणा करून तुह्मांस सामील होतील. रोहिलेहि पारचे येणार नाहीत. कित्येक टोपीवालेहि सरकारांत