पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/468

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४३ [२३७] ॥श्री॥ २ सपर्टवर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुमची पत्रे आली ती पावली. ठाण्याचा बंदोबस्त होऊन गंगाकिनारा जाऊन शह देतों ह्मणोन व अबदालीकडील व रोहिले सुज्यातदौले यांजकडील वर्तमान विस्तारे लिहिले ते कळलें. ऐशियास, आह्मी प्रस्तुत दिल्लीत राजश्री नारो शंकर यांस तीन हजार प्यादे व तीन हजार राऊत व सामान सरंजामसुद्धा ठेऊन बंदोबस्त केला आहे. पलीकडून रोहिले अबदाली यांची तहाची राजकारणेहि आली आहेत, बोलतात. सुज्यातदौले यांचहि फारकरून राजकारण आहे. ठहराव अद्यापि कोणताहि नाही. याकरितां आलीं सर्व घाटांचे बंदोबस्त केलेच आहेत. तर्त त्यांजकडील राजकारणाचा बनाव बसतो न बसतो हे पहात येथे बसल्याने ठीक नाही. याकरितां कुंजपु-याकडेहि जाणार आहों. येथील बंदोबस्त केलाच आहे. व आह्मी तिकडे गेल्यानंतर तेहि इकडे राहत नाहीत. त्या रोखें सहजांत येतील. तेव्हां दिल्लीकडील शह चुकला. आपला मुलूख पाठीसे पडोन लढाई पडली तरी तिकडेच पडेल. असाहि प्रकार योजिला आहे. करूं. तुहीं यावयाचा मजकूर लिहिला तरी तूर्त इकडे न येणे. तह्मी व राजश्री गोपाळराव गणेश ऐसे मिळोन दहा बारा हजार फौजेनिशी कनोजेजवळ पलीकडील दबावास जाऊन रहावें. ह्मणजे सहजच पलीकडून रोहिले इकडील गेले आहेत ते व तिकडून येणार त्याजवरी दबाव पडेल. ते इकडे यावयाचें करणार नाहीत. सुज्यातदौले ममतेने बोल ३०६ मराठे कुंजपुऱ्यावर गेल्यावर अबदाली यमुना उतरून येईल व यमुनेवरील पायउतार कुंजपुयाच्या उत्तरेस असल्यामुळे अबदालीची पाठ पंजाब व अफगानिस्थानाकडे होईल व मराठ्यांची पाठ माळवा व बुंदेलखंड ह्या प्रदेशाकडे होईल अशी भाऊंची अटकळ होती. परंतु, मराठ्यांनी कुंजपुऱ्याला मोर्चे दिले असतां, अबदालीला, यमुतेला उतार नसल्यामुळे, कुंजपुन्यांतील कुतुबशाहाला मदतीस येण्यास सापडले नाही. भाऊंच्या त्या दोनचार महिन्यांतील डावपेचांचे सविस्तर कथन प्रस्तावनेत केलें आहे.