पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४३ येतील. पुत्रास व हमसी फकरूदौला यास त्याणी लिहिले की पत्रदर्शनी उठोन येणे. पंत सांगतील त्याप्रमाणे त्यांची मर्जी तुह्मीं राखणे. आणि बिबीनेंहि यास लिहिले. ते उठोन फरूकाबादेस गेले. राजेश्री माधवराव यास नेऊन कनवजेंत बसविलें. दुसरे दिवशी तिरवेयावर आलो. गडी तयार तिरवेयाची होती. पांचशे सातशे बरखंदाज जमा केला. चौफेर घेरून उभे राहिलो. हल्ला करावा हा विचार करीत होतो. तों फौज सभोवती उभी राहिली. पाहोन घाबरे झाले. वकील येऊन रदबदली केली. कौल घेऊन समरसिंग बबेला भेटीस आला. गडी खाली करून दिली. दुसरे रोजी आहेरवाला पेमशिंगहि भेटीस आला. गडी खाली करून दिली. ठाणे सरकारचे बसलें. हटिया आज खाली होईल. खणून टाकून खेरनगर, भुजाजंग, खतलाख, मोहना, बरगांव वगैरे तमाम खाली झाली. ठाणी बसली. पाडितात. उदईक येऊन कुच करून, बिदरास जाऊन, स्नान करून, घाटपुरावरून उमरगडी येऊन. श्रीमंत स्वामींचे कृपेनेंच हे कार्य झाले. नाही तर, मोठे संकट होतं. दोन मास गडी घ्यावयास लागती. सर्व उत्तम जालें. नक्षहि जाला. आणि कार्यहि जालें. माणसहि जाया न जालें. संतोषाचें वर्तमान तुह्मांस कळावे ह्मणोन लिहिले आहे. सुजातदौले जाऊन अनुपशहरी भेटले. बहुत शिष्टाचार मुबरात शिरपाव अबदालीने दिल्हा. दुसरे रोजी वजिरीचा शिरपाव देऊ लागला. तेव्हां याणे विनंति केलीः पातशाहा कोण ? मी वजीरी कोणाची करावी ? तुही पातशाही तखती बसा; मी वजारा करान. उगीच वस्त्रे देऊन माझी फजिती कां करितां ?" त्याजवर अबदालीने सांगितले की प्रातःकाळी याचा जाब देऊन. त्याजवर रातीस सर्व लहान थोर अबदाली जमा करून मसलत केली की आपणास येथे राहणे नाही. आणि मराठे यांचा जोर दिवसेंदिवस होऊ लागला. त्यास कोणाची गोष्ट ऐका नये. मराठे यांशी सलख करून आपले देशास जावं. हैं वर्तमान बोलत आहेत. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.