पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/466

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४१ स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. इकडे तमाम तोफखान्याचा बंदोबस्त करून एका जुटीनें मजबुतीने लढाई करणे लागते. याकरितां तुह्मापाशी राजश्री रूपराम अडारूचे भाऊ वगैरे, पठाण रोहिले असतील, ते चारशेपर्यंत देखत पत्र हुजूर पाठवून देणे. ते लोक अशा लढाईचे कामाचे आहेत. जरूर या प्रसंगी असावे लागतात. तरी सत्वर पाठवून देणे. पैकियाची तरतूद लौकर करणे. पाठवून देणे. विलंबावरी न घालणे. खर्चाची ओढ फार आहे, ह्मणोन लिहिले असे. तरी सत्वर पाठवून देणे. दिरंगाईवरी एकंदर न घालणे. छ १४ मोहरम. हे विनंति. - - - [ २३६ ] ॥ श्री॥ २९ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी: पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ मित्ति श्रावण वद्य ३ मु॥ तिरव जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असीले पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान या प्रकारचे आहे. आगीं मौजे मही घेऊन सेगर नदीवर येऊन दरमजलींनी तालगांवीं ईसन नदीवर आलो. पाऊस अतीशय. चिखल झाला. नद्या भरल्या व जलमय सर्व जालें. परंतु तसेच भिजतच दरमजलींनी तालगांवीं ईसननदीवर आलों. पठाणाजवळ स्वार, प्यादे दोन हजार होते. परंतु त्याजला कळले की कजियास आले. चार कोस त्या जसी आमांस अंतर राहिले. त्याजवर त्यांणी मातबर वकील पाठवून सलूख केला. इतक्यांत नवाब अहमदखान याची पत्रे आह्मांस आली. साहेबजादे यांस व फकरदौला यांस आली. आह्मांस लिहिले की सर्वस्वी मी तुमचा आहे. मागे मुलेमाणसे आहेत. चिरंजीव आहेत. तुमचे भरंवसेयावर वरकड कनवज वगैरे ठाणी एक मतलबाकरितां बसविली होती. तुमची मर्जी. परभारें उठोन