पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३८ जवळ जमा व्हावें. एक लाख खर्चास देऊन इकडे आणावें. यांत फौजहि फुटते. येथेच आल्या लढाईत वसवास राहतो. यास्तव या॥ केले आहे. जे येतील ते तुझास पत्र घेऊन येतील. त्यांस आपलेजवळ जमा करणे. रसद बाकी एकूण वीसपंचवीस लाख जरूर तरतद, तुर्त सत्वर कांहीं, निमे पुढे पाठवणे. त्या वारंवार न लिहिणे. र॥ छ ५ मोहरम. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२३२] ॥ श्री ॥ २० आगष्ट १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥ यांसिः विनंति उपरि. सादुल्लाखान वगैरे रोहिल यांचा पैगाम आहे की पार गंगेच्या उतरावयाची फौजेची तरतुद करावी. नावाडी सोरमचे घाटचा थुरिया आहे. त्यास आपण जावयाचे सांगतो. फौजा जातील. त्याणी त्यास न्यावें. वस्त्रे देऊन उमेदवार करावें. नावा जमा कराव्या. ह्मणजे पुल बांधोन पार फौज उतरेल. याप्रे॥ सोरमच्या घाटी केलिया पारचे रोहिले वगैरे इकडे येणार नाहीत. तिकडील हंगामियामुळे गिलज्याच्या लष्करांत जे आहेत ते इतक्याच निमित्य उठान जातील. त्यास, सदहूं। तुह्मी लिहिल्या घाटास येऊन, थुरिया नावाडी यास नेऊन, वस्त्रे देऊन, नावा जमा करून, पूल बांधोन, उतरावयाची तयारी करणे. र॥ छ ८ मोहरम. हे विनंति. [२३३] ॥ श्री॥ २१ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून