पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/464

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. अबदालींची फौज दिल्ली घेतली यामुळे फार घाबरी जाहली. रोहिले फारकरून पार गेले. राहिले जाणार. नजीबखान मात्र हिमत धरून दाखवितो. सुज्याअतदौला जाऊन फसले आहेत. याजकरितां स्वामीनी दम धरून काम करावें. पुरतेंच त्याचे पारपत्य होईल. फौजसुद्धा यावं तर इकडे ठाणी कायम करणे हे काम टाकून येतां नये. याजकरितां गुंतलों ह्मणून लिहिले तें कळले. ऐशियास, दिल्ली घेतली. त्याजवर सलाबत चढली. आंत फार फुटफाट आहे. परंतु नजीबखान त्यास हिमती देऊन आपलें बरे करून घेऊन त्यास लावणार. त्यास येथेहि नजीबखान व सुज्याअतदौला वगैरे राजकारणे आहेत. परंतु अद्यापि ठीक बरे कोणीहि बोलत नाहीत. पुढे होईल ते पाहूं. त्यास येथे कित्येक तुराणी फुटून चाकरीस येणार त्यासि करार हाच की उठोन अंतरवेदीत जावें. तुह्माजवळ जमा व्हावं आणि पार उतरणे जाहलें तर उतरावें. अथवा तेथून आगरियाकडे उतरून आणणे तर आणावे. असे प्रकार बोलतात. येणार त्यास पत्रे तुह्मांकडे जावयाची देऊन रवाना करूं. ते येतील त्यांस आपलेजवळ जमा करणे. दुसरें रोहिल्यांचे अनुसंधान आहे की आपले तालुकियांत पार उतरावयाची अवाई घालावी आणि गंगातीरीं कनोजपुढे आमचे मुलखांत फौज आली ह्मणजे पार गेले ते येणार नाहींत. व येथे जे दुदिले आहेत तिकडील दंगियामुळे उठोन येतील. त्यांची गुज मोडेल. हा प्रकार आहे. तरी तुझी कनोजेपुढे रोहिल्यांच्या मुलखांत गंगातीरी येऊन पार उतरावयाची अवाई घालणे. गंगातीरी राहणे ह्मणजे यास पायबंद बसेल. आणि जे दुदिले जाहले असेत ते यास सोडन जातील. हे काम करणे. फौज बुंदेले वगैरे जमा करणे. पैका लौकर रवाना करणे. सादलाखान वगैरे रोहिले हे ह्मणतात की फुला नावाडी यास गंगातीरी फौजा पावया बोलवावें. आपणहि त्यास पाठवून देतो. आणि नावा जमा करून पार उतरावयाचा हंगाम करावा. ह्मणजे हे निमित्य ठेवन सारे तिकडे निघोन जाऊं. त्यास त्याजलाहि पत्र दिले आहे. तरी तह्मीं