पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २३०] ॥ श्री॥ १६ आगष्ट १७६०. - राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. ऐवजाकरितां तुझांस वारंवार लिहीत असतां अद्यापि ऐवज येत नाही हे कोण गोष्ट ? प्रस्तुत सर्व अर्थ राजश्री गंगाधर मल्हार यांस आज्ञा करणे ती केली आहे. हे लिहितील त्याप्रमाणे सत्वर ऐवजाची तरतूद करून पाठविणे. दिरंग न लावणे. वारंवार लिहित गेलो. दहा लाखपर्यंत बाकी व पंधरा लाखपर्यंत रसद एकण पंचवीस लाखपर्यंत जलदीने येत तें करणे. तिकडील वर्तमान लिहिणे. जाणिजे. छ ४ मोहरम सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२३१] ॥श्री॥ १७ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांति: पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. सरकारांत तोफखान्याकडे बैलांचे प्रयोजन जरूर फारच आहे. याविषयी पेशजी तुह्मांस लिहिलें भारत परंतु प्रस्तुत फार निकड आहे. पावसामुळे तोफखान्याचे बैल खराब जानन मरतात. यास्तव तुमचा तालुका विटावे वगैरे जवळ आहे. येथील पांचशें बैल सत्वर जमा करून हुजूर पाठविणे. येविषयीं दिरंग लामा काम नाही. तरी लौकर बैल चांगले, मजबूत, गाड्याचे कामावर रवाना करणे. जे जे जमा होतील तितकेच जलदीने रवाना करीत बैलाविणे खोळंबा झाला आहे. हे ध्यानात आणून लौकर पाठविणे न करणे. + अबदालीची फौज कांहीं फुटन येणार. त्यांचा करार