पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरी हे कामाचे नाही. येविषयींची चौकशी करून लोकांस ताकीद करणे. कोणाचे बुणगे वस्तभाव जाऊ न देणे. जाणिजे. छ ३ मोहोरम सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २२९] ॥ श्री॥ १६ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणे. विशेष. तुह्मांस ऐवजाविषयी बहुतच पत्रे गेली. तुह्मांसारखे मातबर मामलेदार भरंवशाचे माणूस. तुझांकडून कांहींच तरतूद होऊन येत नाही. दोन लक्ष रुपये पाठविले तेवढ्याने काय होणार? खावंद मसलतशीर असल्यास तुही एकदोन सालचा अगाऊ ऐवज सरकारांत द्यावा. पुढे महालांत उगवून घ्यावा. त्यास तोहि प्रकार नाही. सालमजकूरची रसद व गुदस्ताची बाकी येणे. त्यास त्या ऐवजी तुझी कर्जवाम घेऊन रोख ऐवज पाठवावा. चाकरी करून दाखवावी. त्यास असाच मजकूर लिहितां आह्मी भागलो. परंतु तुमचे चित्तांत किमपिच येत नाही. सरकारांत पैका दिला ह्मणजे बुडाला वाटतो. असेंच चित्तांत येते की काय हे कांहींच कळत नाही. याउपरि सर्व अर्थ ध्यानांत आणन, तुमची या प्रांतीं पत चांगली आहे, मोबदला करून मातबर ऐवजाची रवानगी करणे. पंचवीस लक्ष रुपये तुझांस द्यावे लागतील. याची काळजी चित्तांत धरून पत्र पावतांच ऐवजाची रवानगी करणे. दमाजी गायकवाड वगैरे वराता झाल्या आहेत त्यांस ऐवज देणे. जाणिजे. छ४ मोहोरम. सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणे. हे विनंति.