पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/457

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिरंजीव बाबा, उमरगडीं एकत्र होणे, की पठाणाकडील काम नासो अगर होवो तुह्मीं येणें. तर तैसेंच लिहिणे. अगर आठ रोजांत पठाणाचें पारपत्य करून फौज त्या शहवर ठेवून येणे, नव रोज लागणार नाही, तरी तसेच लिहिणे. हे दोन्ही कार्यास न येत. आहह्मीं जाऊंच नये माघारे उमरगडीं यावें तर तैसेंच लिहिणे. सत्वर उत्तर पाठविणे. फौजेचा रंग ह्मणावा तर जर मी उमरगडास चालिलों तर सर्व माघारे येतील. पाय कोणी घेत नाही. पुढे कोणी धजत नाही. असें संकट प्राप्त. जर फौज पुढे जाईना तर पठाण कसे दबतात ? आणि जावें तर तिकडे फडणीस श्रमी. याजकरितां दोनी पेंच आहेत. यांत तुझी लिहाल तें करून. बलबेर येथे गेलियाने आज नफा आह्मांस कांहीं नाहीं. तूर्त कांही मिळणे नाही. न गेलियाने त्यांचा फैलाव जालियास तमाम ठाणी राहणार नाहींत. दंगा होईल. याजकरितां पठाणाचें पारपत्य जरूर पाहिजे. त्यास, याचा जैसा तुझी जबाब लिहाल त्याप्रमाणे करून. उत्तर सत्वर पाठवणे. नदीवर आहे. फडणिसांनी समाधानें आठ रोजांत जाऊन यावें असें लिहिले तर जाऊन. त्याणी लिहिलें की जाऊं नये तर न जाऊन. उत्तर प॥. सविस्तर चिरंजीव बाबास लिहिलें तें तुहीं, फडणीस एकत्र होऊन उत्तर पाठविणे. नदीवर मुक्काम आहे. तुमचे लिहिलेप्रमाणे करून, बहुत काय लिहिणे, कृपा लोभ असो दीजे. हे विनंति, [ २२६] ॥श्री॥ १२ आगष्ट १७६०. प॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरिः सुज्यातदौला याचे जमातदार व जमीदार सारे मिळोन गडबड भाऊबंद बेराजी आहेत. त्यांचे अनु- करावी हा मनसुबा करितात. त्यांसंधान आले होतें तें खरें करावयास जकडेहि पत्रे पाठविली आहेत. जाब