पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/456

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बोलत होता. प्रस्तुत रसद वगैरे पैक्याची तरतुद होऊन येईना, हे कामाचें नाही. अंतर्वेदचा बंदोबस्त करणे. बंगस व कांहीं रोहिले घरास जातील. सुजादौलाची उमेद अबदालीस कळली ! आंतील आंतहि पेंच वाढतील. दिल्ली घेतल्यामुळे कमर तुटली ! पुढे सर्व उपाय करणे तो करितों. लढाई तर पाण्यावर मौकूफ आहे. तोपर्यंत फुटफाट करणे ते करितों. तुमची बातमी ठीक आहे. वरचेवर लिहीत जाणे. ॥ छ २० जिल्हेज. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २२५] ॥ श्री॥ ९ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री मुकुंदपंत स्वामीचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ प्रथम श्रावण वद्य १३ मुक्काम नदी सेगर जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. पठाण फरुकाबादकर कनवजेस हजार स्वार जमा झाला आणि चारशे स्वार बलबेर येथेहि आहेत. त्याजला तेथन काहाडिले पाहिजे. नाही तर, मागती मुलकांत फिसाद होणार. चार सा रोजांचे कार्य आहे. मी माघारा येतांच, तमाम सरदार माघारे येणार. कोणास नालबंदी पाहिजे; कोणास अर्जबाब ; व कोणी आह्मी तेथेच ते राहणार. असा प्रसंग! जर आह्मीं तपशील लिहावा तर फडनिसास संशय निर्माण होतो की हे महिना दोन महिने फिरावयास जातात. हे त्याजला भासते. आणि येथे लढाईचा प्रसंग दिसतो. त्यास, तुझी व जनार्दनपंत, एकदम बहाल करण्याची त्याची ऐपत होती असें बिलकुल वाटत नाही. भाऊसाहेबाला ज्याच्याने सबंद वर्षात २५ लाख रुपये देववतना, तो शहाण्णव लाख रुपये बहाल देईल हे साक्षात् हिशेवी पुरावा आल्यावांचून खरें मानितां येत नाही. ३०३ अबदालीकडील सरदारांसरदारांत. ३०४ यमुनेच्या पुरावर.