पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देऊन हत्यारसुद्धां बाहेर काढून छ १९ जिल्हेजी किल्ला फत्ते जाहाला. जागा फारच बेश, मजबुदीची आहे. याउपरि सर्व बंदोबस्त यथास्थित होईल. सुज्याअतदौलेहि जवळ यमुनेचे पैलतीरी येऊन उतरले आहेत. गोड बोलतात. पुढे होईल वर्तमान ते लिहिले जाईल. ऐवजाविशी वारंवार लिहिले असोन अद्याप ऐवज येत नाही हे कोण गोष्ट ! याउपरि पत्र पावतांच बाकीचा ऐवज व रसदेचा भरणा करून जलदीने पाठवणे. विलंब न लावणे. ऐवज रवाना जाहला आहे तोहि ताकीद करून सत्वर येई तें करणे. + ऐवजाविशी वारंवार लेहून भागलों ! याउपर मिळेल त्यापासून पैका घ्यावा हेच बाकी राहिली ! श्रीरंगपट्टणाचे वर्षी फारकरून दाखवायाचे ३०१ १आगष्ट १७६०. ३०२ श्रीरंगपट्टणचें वर्ष झणजे इ. स. १७५७. ह्या वर्षी फेत्रुवारीत नानासाहेब पुण्याहून निघून मार्च-एप्रिलांत श्रीरंगपट्टणाजवळ जाऊन तेथून खंडणी घेऊन जूनअखेर पुण्यास आले. पाठीमागे, गोपाळराव गोविंद, मल्हारराव भिकाजी व बळवंतराव गणपत हो मंडळी तें सबंद साल तिकडेच खंडण्या वसूल करीत होती. १७५७ च्या जुलैंत नाना व भाऊ पुण्यास असतां गोविंदपंत बुंदेले त्यांस भेटण्यास आले होते ( लेखांक ७२ ). 'मराठ्यांचे पराक्रमां'त ( पृष्ठं १०२ व १०३ ) रा. पारसनीस ह्मणतात की गोविंदपंत बुंदेले पुण्यास सावनच्या मोहिमेच्या अगोदर आले होते त्यावेळी त्यांनी शहाण्णव लक्षांच्या हुंड्या श्रीमंतापढें ठेविल्या व हिंदुस्थानांत परत येतांना बहुमानार्थ पेशव्यांनी कानिटकर व येरंडे हे दोन दरखदार त्यांस नेमून दिले. कानिटकर व येरंडे हे दरखदार पंतांच्या बहुमानार्थ नेमून दिले नसून, पंत हिशेवांत कुचराई करीत ती त्यांनी न करावी ह्मणून त्यांच्यावर देखरेखीकरितां पाठवून दिले होते, हे आह्मी मागील एका टीपेत साधार दाखवून दिलेच आहे. कानिटकर व येरंडे १७५७ त गोविंदपंतावरोवर हिंदुस्थानांत गेले हेहि गोविंदपंताच्या १७५९ तील पत्रांवरून स्पष्ट आहे. तेव्हां गोविंदपंत सावनूरच्या मोहिमेच्या अगोदर पुण्यास आला व त्यावेळी हे दरखदार त्याच्याबरोबर हिंदुस्थानांत गेले हे विधान निराधार आहे हे उघड आहे. सावनूरची मोहीम १७५५च्या दसऱ्यास सुरू झाली. अर्थात् १७५५ त हे दरखदार गोविंदपंतावरोवर गेले नाहीत हे अतिच स्पष्ट आहे. तसेच गोविंदपंत खतः १७५५ त पुण्यास आला होता की काय हेच मुळी संशयग्रस्त आहे. ह्या विधानावर बखरीखेरीज इतर योग्य आधार असल्याशिवाय विश्वास ठेववत नाही. तसेंच गोविंदपंतानें ९६ लक्ष रुपये पेशव्यांस बहाल केले ह्मणून एक विस्मयजनक पोटविधान आहे. परंतु, गोविंदपंताच्या हिशेबाची धरसोड पहातां व त्याचा एकंदर दर्जा पहातां, इतकी रक्कम