पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहिला व दिल्लीत फौज त्यांची हजागर्यंत आहे, अधिक नाहीं, येविशीं आह्मांस आज्ञा करावी ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, दिल्लीस उभयतां सरदार व राजश्री बळवंतराव गणपत हुजरातची फौजसुद्धां रवाना केले. त्यांणी दिल्लीस जाऊन, हल्ला करून शहर घेतले. त्याच लगटासरसे किल्यांतहि लोक शेपन्नास जाऊन पोहोचले. परंतु लोक किल्यांत जाऊन लुटीस गुंतले. त्यामुळे फिरोन किल्लेकारांनी सावध होऊन बाहेर काढिले. प्रस्तुत यांणी तमाम शहरचा बंदोबस्त केला. किल्यास मोर्चे लाविले आहेत. लौकरीच फत्ते होईल. आह्मीहि दरकुच जात असो. एकादो दिवशी खासा स्वारी जाऊन पोहोचेल. तुह्मांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. र॥ छ १४ जिल्हेज. हे विनंति. - - - - २२४ 7 पे॥ छ ४ मोहरम. ॥ श्री ॥ २ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः . पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल नाणन स्वकीय कुशल लिहीत जाणे. तुमची पत्रे आली ती पावली. सायंत लिहिलें वर्तमान कळों आले. याउपरिहि तिकडील सर्व वरीचेवरी लिहीत खासा स्वारी मजलदरमजल येऊन दिल्लीस दाखल जाहाली. तमाम शहराचा बंदोबस्त केला. किल्यांत अबदालीकडील लोक होते याकरितां किव्यास मोर्चे लाविले. खंदकावरी मोर्चे कायम होऊन तोफांचा मार दिल्हा. तेव्हां आंतील लोक घाबरे होऊन कौल मागों लागले. सबब त्यांस कौल ३०. आठशे पठाण' ह्मणून भाऊसाहेब यांच्या कैफियतींत (पृष्ठ ९) लिहिले आहे. ह्याच पृष्ठावर वरती ' आठ हजार ' पठाण ह्मणून लिहिले आहे ते चुकले आहे. ही चक मूळ बखरीवरून दुसरी प्रत करून घेणाऱ्याची आहे. 'भाऊसाहेबांच्या बखरी'प्रमाणे हीहि बखर बरीच विश्वसनीय आहे. छापील प्रत मूळ अस्सल बखरीवरून केलेली नाही; अस्सल बखरीच्या एखाद्या लेखी प्रतीवरून केलेली आहे. ४२.