पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/451

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सदैव पत्र पाठवीत जावें. श्रीमंताच्या पत्रांची उत्तरे पाठविली आहेत त्यावरून सर्व कळों येईल. श्रीमंती लिहिले॥ तरतूद करावी. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२१८] ॥श्री॥ २२ जुलै १७६० राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्रे पाठविली ती पावली. सुज्यातदौले याजकडील व अबदालीकडील व रोहिले यांचे वर्तमान विस्तारें लिहिलें तें सर्व कळले. ऐशियास, ये विषयींचा प्रकार अलाहिदा पुरवणी पत्रीं लिहिला आहे त्यावरून कळेल. वरचेवर तिकडील बारीकमोठे वर्तमान लिहीत जाणे. रवाना छ ९ जिल्हेज. हे विनंति. [२१९] ॥ श्री॥ २२ जुलै १७६०. पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः विनंति उपरि. शाहाजादा, पटणे मजबूद. जाफरअल्लीचा पुत्राहि जमावर सुद्धा आला. त्यामुळे पटणे सोडून झाडीत गेला. त्यामागे मीरनहि गेला. त्याकडे काशीद गेले आहेत. वर्तमान आलिया लिहन पाठवितों. शाहाजाद्याकडे अबदालीचे, सुजाउतदौलाचे, नजीबखानाचे, आणावयास वकील गेले आहेत. परंतु, त्याणे विचार केला की कोणी वजीर जाहालिया आपणास उपयोगी नाही. यास्तव सध्यां कोठेच न जावें हा विचार करून त्यांस उत्तरें बाजतबरसात में करणें तें करूं ह्मणून लिहून