पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिली. तो जात नाही ह्मणून लिहिलें तें कळले. याउपरहि तिकडून बातमी उत्तम प्रकारें राखून लिहून पाठवीत जाणे. र॥ छ ९ जिल्हेज. हे विनंति. [ २२० ] ॥श्री॥ २७ जुलै १७६०. पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः विनंति उपरि. पत्रे पाठविली ती पावली. सुजातदोले यांच्या मुलुखांत दंगा करावयाचा प्रकार लिहिला, त्यास मातबर मातबर जमीनदारांस पत्र पाठवून लगामी लावून ठेविले आहेत. त्यांचे वकील आणून सविस्तर लिहितों. त्याजकडे कुमकेस सरकारची फौज दहा हजार यावी ह्मणजे सर्व गोष्टी ठीक होतील. परंतु काशींतील बंदोबस्त केला पाहिजे ह्मणून लिहिले ते कळलें. ऐशास, दिल्लीकडील काम उरकल्यानंतर पार फौज येईल. परंतु जमीदारांस बोलावून तालुक्यांत बखेडा करावयास विलंब न करणे. काशीचा बंदोबस्त तह्मी हुजूर आलियानंतर केला जाईल. रवाना छ १४ जिल्हेज. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २२१] ॥श्री॥ २८ जुलै १७६०. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी - गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुझी विनंतिपत्रे पाठविली ती पावली. ठाण्यांचा बंदोबस्त ठीक करून लोकरीच हुजूर येऊन पोहोचतों ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, उत्तम आहे. बंदोबस्त करावयास दिरंग न लावणे,