पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२५ मातबर पैकियाचा तुमचाच. त्या सत्वर पैका येईसा पाठवणे. भदावराकडून वाट चांगलीच आहे. जरूर रवानगी करणे. जाणिजे. पंधरा रोजांत पांच लाख रु॥ जरूर पाठवणे. हे विनंति, [२१७ ई] ॥ श्री॥ राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ विश्वासराव बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळले. याउपरिहि सविस्तर वर्तमान निरंतर लिहीत जाणे. वरकड वर्तमान तीर्थरूपांनी लिहिले आहे त्याजवरून सविस्तर कळेल. +बहत काय लिहिणे. हे विनति. [ २१७ ऊ] ॥ श्री॥ राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ महीपैतेराव आवजी कृतानेक सा॥ दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिले पाहिजे. विशेष. आपलं पत्र आले तें पावोन संतोष जाहला. लिहिला अर्थ सविस्तर कळों आला. ऐसेंच २९८ विश्वासरावाची ही अशीच कुशलार्थाची आमचे जवळील सर्व पत्रे आहेत. भाऊसाहेब बरोबर असल्यामुळे विश्वासरावाला प्रमुखपणे वागतां येत नसे. २९९ पानिपतच्या लढाईत परभू गृहस्थ हा एवढाच दिसतो. भाऊसाहेबांच्या कैफियतीत ( पृष्ठ १२) बाजी हरी झणून एक नांव येतें तें कदाचित् कोण्या परभू सरदारा, असावें. ह्यावेळी पाभूमंडळ नागपूरच्या दरबारांत विशेष होते. परंतु, जानोजी व मधोजी भोसले यांच्यापैकी पानिपताला कोणीच गेला नाही. तेव्हां त्यांच्या पदरची परभूमंडळीहि गेली नाही हे रास्तच होते.