पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२४ [२१७ अ] . ॥श्री॥ अजमा ५ जुलै १७६०. - राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. तुझी दोन पत्रे एकासारिखीएक मजकुराची पाठविली, त्यांत कलमवार सुज्याअतदौला याजकडील मजकूर व पत्र पाठवून द्यावयाचा अर्थ लिहिला तो कळला. ऐशियास, कलमवार मतलबाचे उत्तर, सरदारांची आमची भेट रविवारी होणार ती होऊन, पाठवू. तूर्त पत्र खातरनिशेचे सुज्याअतदौलास व त्याचे मातोश्रीस पाठविले आहे. त्यांणी, आह्मी जवळ आलों, आतां चित्त थीर करून, अबदालीचे भय चित्तांतून टाकून, निःशंकपणे आह्मांस येऊन मिळावे. त्यांत फार नफे आहेत. अबदाली अनेक प्रकारे त्यास वाईट तेंच करील. नजीबखान मायावी, हरप्रकारे यास फसवील. परंतु यांत नफा नाही. फारच गैरनफियाची गोष्ट. ते स्नेही आणि आझांस त्याचे कल्याण व आपलाहि उपयोग तेच सांगणे. यास्तव साफ उत्तर देऊन नजीबखान यास लावावें. नजीबखानाचेंहि पारपत्य त्याचे चित्तानुरूप होईल. तरी हा प्रकार बोलोन, त्याचे गोसावी व कांहीं फौज अलीकडे उतरली ती त्याजकडे जाणार हे आहे, तरी ती गोष्ट सहसा न व्हावी हेहि करणे. वर्तमान लिहिणे. जाट आपली ठाणी कायम करितात. आली आगरियाजवळ जातो. तुही तिकडील ठाणी कायम करणे. नजीबखानास धुडावून द्यावयाचा विचार सुज्याअतदौला याजकडून करणे. वर्तमान लिहीत जाणं. जाणिजे. दिल्लीहून वर्तमान आले की अबदालीने मारेकरी सुज्याअतदौलास घातले होते. त्यास ते व कागदपत्र सांपडले. सज्याअतदौला यांणी त्यास मारले. त्यास याचाहि मजकूर कसा तें लिहिणे. तुमची बातमी बारीक मोठी रीतीने फारच आहे. तुह्मांकडे खबर येऊन मग इकडे यावयास उशीर लागतो. त्यास अबदालीचे लष्करांतून व सज्याअतदौला याचे लष्करांतून बातमी परभार इकडे यावी असे करणे. पैकियाची तरतूद केली परंतु येत नाही. येथे बोढ. उज्जनीहून पैका आला परंत पंधरा रोजांत उडून जाईल. भरंवसा २९७ ६ जुलै १७६०, रविवारी भाऊंची व सरदारांची भेट झाली.