पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/448

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२३ [२१७ ] ॥ छ १६ जिल्हेज. ॥ श्री ॥ १६ जुलै १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. आह्मीं सरदार जाट सहवर्तमान छ २ जिलकादी मथुरेवर आलो. पुढे कर्तव्यार्थ करीतच आहों. पलीकडे उतरावें तर नदीस पाणी फार. त्यांत जाटांकडील हजार दोन तीन फोर उतरली. मानाजी पायगुडे वगैरे सरकारची पतकेंहि उतरणार. पलीकडील ठाणियांचा बंदोबस्त करावयास हे फौज फार उतरली. यावरून अबदालीकडीलहि मातबर फौज इकडील शहास येणार. यास्तव तुहीं फार सावध राहणे. ठाण्यांचा बंदाबस्त उत्तम रतिीने करणे. कदाचित् तिकडे त्यांची फौज आली, तर ठाणेदार मरत न पळत ऐशी मजबुदी करणे. येथेहि सरकारची आणखी फौज फार उतरली, तर तुझांसहि वरचेवर इतला दिला जाईल. परंतु सावधगिरीने राहणे. रवाना छ २ जिल्हेज. बहुत काय लिहिणे. हे विनंति, नाव अबदालीला पायबंद देणे. (५) जमीदारांकडून दंगा सुजाउद्दवल्याच्या प्रांतांत करविणे. (६) बुंधेल्यांना सरकारच्या प्रांतांत दंगा करूं न देणे. (७) बुंधेल्या सरदारांना सैन्यासह भाऊसाहेबांकडे पाठविणे. (८) यमुना उतरण्यास नावा जमविणे. ह्या आठ कामांपैकी एकहि काम गोविंदपंताचे हातून झाले नाही. भाऊसाहेबांची ओरड शेवटपर्यंत एकसारखी चालू होती. २९६ ‘फार' हा शब्द 'पार' ह्या शब्दाबद्दल लिहिलेला दिसतो. भाऊसाहेबाचे मनांतून यमुना उतरून अंतर्वेदीतून अबदालीला रेटीत यमुनेंत नेऊन बुडवावयाचे होते असे दिसते. परंतु, बोटी न मिळाल्यामुळे व पूल बांधतां न आल्यामुळे यमुना उतरून जाण्याचा बेत रहित करणे भाऊस भाग पडले. गोविंदपंताला नावा जमा करावयाला सांगितले असून त्या त्याने केल्या नाहीत.