पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोक पलीकड़े गेले आहेत. आणखी जातील. आह्मी जलदीनेच पार फौज आगरियाजवळ पूल बांधोन उतरतों. एका दो दिवशी आगरियास जाऊं. पाऊसामुळे इतके मुकाम जाहाले. नाही तर पोहोचलों असतो. सुज्याअतदौला यांणी पुर्ती लबाडी केली. याउपरि त्याचे तालुकियांत फौज उतरावी. जमीदार सर्व आपले लगामी लागावयाचे असले त्याजला उत्तेजन देऊन दंगा करवावा. तमाम अंमल उठेवावा. तसेंच बलबडसिंग याजपासूनहि दंगा करवावा. याची तरतूद अव्वल केली पाहिजे. हे जरूर करणे. सर्व प्रकार, कसे कोण हाती आहेत, ते कसे करणार, सरकारची फौज उतरलिया नावांचे अनुकूल कसे पडते तेंहि सर्व लिहिणे. प्रयागपर्यंत अंतर्वेदीत त्याचा अंमल आहे तो उठवावा. प्रयागचे राजकारण जाहालें तर करावें. परंतु अंतर्वेदींत जो अंमल असेल तो उठवावा. हे करावें. पारचीहि तरतूद करणे. उत्तर सविस्तर पाठवणे. जाटाचे परगणियांत त्याची ठाणी बसवणे. आपले परगणियांत आपली बसवणे. बंधेले पाठवणे. गंगापारची राजकारणे नीट करणे. फौज तुझांजवळ पाठवून तुमची रवानगी करावी लागेल. मामला गेला तरी एक साल तुझीं कर्ज पतीवर मेळवून द्यावें. तसा तो मजकूर नाही. बाकीचे ऐवजी व रसद मिळोन पंचवीस लाख सत्वर तरतूद करून पाठवणे. त्या लिहिणे या दिवसांत फारच वाईट वाटते. तुह्मांपासून मोठी कामें घेणे. तुही तरतूदच करावी. ॥ छ २६ जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. . २९५ गोविंदपंताला भाऊसाहेबांनी खालील आठ कामें सांगितली होती. (१) पंचवीस लाख रुपये सत्वर पाठवून देणे. ( २ ) बारीक बातमी शत्रूकडील जलद पाठवणे, (३) सुज्याअतदौला याला आपल्या बाजूला ओढणे. तो अबदालीला मिळाल्यावर, त्याच्या प्रांतांत प्रयाग वगैरे ठिकाणी दंगा करणे. ( ४ ) गोपाळराव गणेश, गणेश संभाजी व गोपाळराव बापूजी यांच्यासह अंतर्वेदीत येऊन कोळजळेश्वरी ठाणे देऊन सुजाअतदौल्या