पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२१ [२१६] ॥ श्री ॥ १० जुलै १७६०. राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि-- तुमचे पदरी मामला केवढा ! तुह्मांपासून रुपया येणे किती! आणि कांहींच येत नाही. येथे खर्चाची निकड. हे कांहींच मनांत नाहीं. अपूर्व आहे ! मागे कांही नव्हतें त्या दिवसांत कशी चाकरी केलीत ! कसे बरें ह्मणोन घेऊन या पद्धतीस आला ! आतां तरी खावंदाचे इतबारी, मातबर मामलत पदरी, पत चांगली, जर दंगा फार जाला तर एके सालचा ऐवज सरकारांत कर्जदाखल मेळवून द्यावा परंतु सरकारचे काम अडूं न यावें ! हे योग्यता असतां तपशील लिहितां हे याउपरि न करणे. पहिले लिहिल्यापें। बाकीचे ऐवजी रुपये व रसदेचा ऐवज झाडून तरतूद हाली सालचा करणे आणि पावता करणे. याशिवाय सावकारी काही कर्ज मिळेल तरी मेळवणे. हिंदुपत तुमचे मामलतेंतील त्यांणी पत्र पावतांच सत्वर फौजसुद्धा यावें. तें न करितां गुमानसिंग खुमानसिंग यास बगलेत घेऊन सरकारचे मामलतींत उफराठी खराबी मांडली असे. हे गोष्ट काही त्यास बरी नाही. तुही कशी करूं देतां ? त्याचा वकील आला, निष्ठनें बोलला, त्यावरून भरंवसा आला. दुसरें, याजवर उपकार किती ! असे असतां, अबदालीची मसलत पडली असतां, घरचे कजिये काढून ह्या गोष्टी कराव्या येणेकरून यास याचे वडील बरें स्वर्गी कसें ह्मणतील ? व याचेंहि बरें काय होईल ? काम तो श्रीकृपेनें खातरखा घडेल. याजवर मात्र शब्द लागेल. पढें फार वाईट. त्यास हे समजावून ताबडतोब त्यास फौजसुद्धा आणून पोहोंचावणे. अबदाली राहिला तेव्हां त्याचं पारपत्य करणे. दो महिन्यांचा अवकाश आहे तो त्यांणी यावें. तिकडील कजियांत एकंदर येऊ नये. आलिया बरे नाही. तुह्मीं फौजसुद्धां अंतर्वेदीत उतरणे. गोपाळराव गणेश यांस मेळवून घेणे. तुझी, ते व कांहीं गणेश संभाजी याचेहि राऊत येतील. तिकडून सारा बंदोबस्त करीत शिकोराबाद येथे येणे. तेथे सरकारचे ठाणेहि बसले आहे. तुह्मीं कोळजळेश्वरपर्यंत आपला अंमल बसवणे. जाटाचेहि